Elec-widget

'चौकीदार चोर है' Vs 'चोर मचाये शोर', सांगली पालिकेत काँग्रेस-भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक युद्ध

'चौकीदार चोर है' Vs 'चोर मचाये शोर', सांगली पालिकेत काँग्रेस-भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक युद्ध

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची आज सुरू झालेल्या सभेत मिरज शहरासाठी राबवण्यात येत असलेल्या अमृत पाणी योजनेच्या ठेकेदारांच्या बिले काढल्यावरून जोरदार गोंधळ झाला आहे.

  • Share this:

आसिफ मुरसल, प्रतिनिधी

सांगली, 12 फेब्रुवारी : अमृत योजनेच्या बिलाच्या मुद्दयावरून सांगली महापालिकेच्या महासभेत जोरदार गोंधळ उडाला. यावेळी विरोधी काँग्रेसने 'चौकीदार चोर है' च्या जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर सत्ताधारी भाजपने आक्षेप नोंदवत 'चोर मचाये शोर' असा पलटवार केला. यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक वादावादी झाली.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची आज सुरू झालेल्या सभेत मिरज शहरासाठी राबवण्यात येत असलेल्या अमृत पाणी योजनेच्या ठेकेदारांच्या बिले काढल्यावरून जोरदार गोंधळ झाला आहे. विरोधी काँग्रेस नगरसेवकांनी अमृत योजनेचे चौकशी होऊन बिलं काढण्याचा ठराव झाला होता. असं असताना ठेकेदारांची बिले काढण्यात आल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी नगरसेवकांनी सभा सुरू होताच, आक्षेप नोंदवत "चौकीदार चोर है"अशी घोषणाबाजी सुरू केली. यामुळे सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक घमासान सुरू झाले. भाजपाच्या नगरसेवकांनी महापौर यांच्याकडे धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या नगरसेवक संतोष पाटील यांच्या निलंबनाची मागणी करत 'चोर मचाये शोर' अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे जोरदार गोंधळ सभागृहात सुरू झाला. तर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी पीठासीन अधिकारी महापौर यांच्यासमोर धाव घेतली. यामुळे गोंधळ आणखी वाढल्याने महापौरांना १ तासासाठी सभा तहकूब केली.

===============================


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 04:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...