News18 Lokmat

मराठा आंदोलनाच्या आगीतही सांगली आणि जळगावात कमळ उमललं !

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अवघा महाराष्ट्र पेटून उठला. या संपूर्ण आंदोलनात सत्ताधारी भाजपची दमछाक करण्यात आली. पण...

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2018 05:09 PM IST

मराठा आंदोलनाच्या आगीतही सांगली आणि जळगावात कमळ उमललं !

अभिषेक पांडे

मुंबई, 03 ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अवघा महाराष्ट्र पेटून उठला. या संपूर्ण आंदोलनात सत्ताधारी भाजपची दमछाक करण्यात आली. सरकावर ताशेरे ओढण्यात आले पण तरी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सांगली आणि जळगाव महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकावला आहे. दोन्ही जागांवर तब्बल 35 वर्षांनंतर भाजपने विजय मिळवला आहे. अर्थात याचा फायदा फडणवीसांना भाजपची मुळं मजबुत करण्यासाठी होणार आहे.

सध्या सांगली आणि जळगावमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे. खरंतर सांगली आणि जळगाव महानगरपालिका निवडणुक ही फडणवीस सरकारसाठी प्रतिष्ठेची अशी होती. आणि ती प्रतिष्ठा राखण्यासाठी ते यशस्वीही झाले आहेत. या दोन्ही नगरपालिका भाजपने अनेक वर्षानंतर जिंकल्या आहेत. तेही अशा वातावरणात जेव्हा मराठा समाजाने भाजप विरोधात तीव्र आंदोलनं केली.

भाजपचा जलवा कायम...!

जळगाव महानगरपालिका निकाल

Loading...

भाजपने 36 वर्षांनंतर स्वत:च्या हिंमतीवर जळगावमध्ये विजय मिळवला आहे. जळगावात आतापर्यंत सुरेशदादा जैन यांच्या खानदेश विकास पार्टींचं राज्य होतं. पण आता भाजपने 75 पैकी 57 जागावंर विजय मिळवला आहे. जळगावात नाराज मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपचा एकदाही प्रचार केली नाही तरीदेखील भाजपने आपला गड राखला. भाजपशी वेगळं होत जैन यांच्यासोबत लढत असलेल्या शिवसेनेला फक्त 15 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर खातही खोलू शकली नाही.

 

सांगली महानगरपालिका निकाल

दिवंगत पूर्व मंत्री पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला असलेलं सांगली देखील भाजपने हिसकावून घेतली. सांगलीमध्ये 78 जागांपैकी भाजपने 36 जागांवर विजय मिळवला आहे. तर युती असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 23 जागा पटकावल्या आहेत. तर अपक्षांच्या खात्यात 2 जागा आल्या. तर शिवसेननं सांगलीत खातही उघडलं नाही.

तसा या निवडणुकांचा अर्थ स्पष्ट आहे. सांगली आणि जळगावमध्ये भाजपचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे शिवसेना भाजपासून वेगळी होऊनही काही खास खेळू शकलेली नाही. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची देखील अवस्थाच आहे. या निवडणुकांमुळे भाजप 100 टक्के त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचलं. एकीकडे याचा शिवसेनेला चांगलाच धडा मिळाला असेल तर दुसरी फडणवीसांची गादी आणखी पक्की झाली असं म्हणायला हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2018 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...