सांगली अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. रुपाली चौगुलला अटक

छातीत वेदना होत असल्याने रुपाली चौगुले एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. सांगली शहर पोलिसांनी तीला रुग्णालयातूनच ताब्यात घेतलय.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2018 05:01 PM IST

सांगली अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. रुपाली चौगुलला अटक

आसिफ मुरसल, सांगली, 17 सप्टेंबर : सांगलीत गेल्या वर्षभरापासून बेकायदेशीर गर्भपाताचा गोरखधंदा करणाऱ्या डॉक्टर रुपाली चौगुले हिला पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं. छातीत वेदना होत असल्याने ती एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. सांगली शहर पोलिसांनी तीला रुग्णालयातूनच ताब्यात घेतल्यामुळे या प्रकरणाचा तपासाला आता गती मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

सांगलीतल्या गर्भपात प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. चौगुले हॉस्पिटलमधल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील संशयित डॉक्टर रुपाली चौगुले आणि तीचा पती विजयकुमार चौगुले हे दोघेही शासकीय सेवेत होते आणि गेल्या वर्षांपासून त्यांचा सांगलीत गर्भपाताचा गोरखधंदा सुरु असल्याची धक्कादायक माहिती काल रविवारी समोर आली होती. चौगुले हॉस्पिटलमध्ये छापा टाकल्यानंतर पोलिसांना तेथे अनेक आक्षेपार्ह कागदपत्रं आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. छाप्यात हस्तगत करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर, या डॉक्टर दांम्पत्याने या ठिकाणी नऊ बेकायदेशीर गर्भपात केले असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांनी रुपाली चौगुले आणि तीचा पती विजयकुमार चौगुले यांच्यासर आणखी एकावर गुन्हा दाखल केला. सांगली सिव्हीलचे अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे हे सुद्धा या रुग्णालयात येत असल्याचे समोर आले असून डॉ. उगणे हे आता या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनाही नोटीस पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तपासणीदरम्यान पोलिसांनी याठिकाणचा औषधीसाठा आणि रोख रक्कम जप्त केली. तपासणी सुरू झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून काही कागदपत्रे जाळण्यात आल्याचाही प्रकार समोर आला होता. हॉस्पिटलमध्ये आणखी बेकायदेशीर गर्भपात केल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने, या प्रकरणाचा तपास आणखी जलद गतीने व्हावा यासाठी कोल्हापूर, सोलापूर, सातारा या ठिकाणी पथकं रवाना करण्यात आली होती. सांगली महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. १० पथकांच्या माध्यमातून सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांची तपासणी केली जात असल्याचे त्यांनी रविवारी स्पष्ट केले होते. तसेच या प्रकरणात या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

गेल्या वर्षी म्हैसाळ येतील गर्भपातामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक हादरुन गेला होता. आणि पुन्हा एक वर्षा नंतर सांगली मध्ये बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

दहशतवादाविरोधात सहा देशांच्या लष्करी सरावाचा चित्तथरारक VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2018 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...