सांगली अवैध गर्भपात प्रकरण : बायको पाठोपाठ डॉक्टर विजय चौगुलेलाही ठोकल्या बेड्या

सांगली अवैध गर्भपात प्रकरण : बायको पाठोपाठ डॉक्टर विजय चौगुलेलाही ठोकल्या बेड्या

सांगलीतीलं बहुचर्चित चौगुले हॉस्पिटलमधील अवैध्य गर्भपात प्रकरणातील दुसरा आरोपी डॉक्टर विजय चौगुले यालाही पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या.

  • Share this:

सांगली, 18 सप्टेंबर : सांगलीतीलं बहुचर्चित चौगुले हॉस्पिटलमधील अवैध्य गर्भपात प्रकरणातील दुसरा आरोपी डॉक्टर विजय चौगुले यालाही पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. सांगलीत गेल्या वर्षभरापासून बेकायदेशीर गर्भपाताचा गोरखधंदा करणाऱ्या डॉक्टर रुपाली चौगुले हिला सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. पोलीस उपाधीक्षक वीरकर यांच्या नेतृत्वात या डॉक्टर दाम्पत्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीतून आणखी काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सांगलीतल्या चौगुले हॉस्पिटलमधल्या गेल्या वर्षभरापासून बेकायदेशीर गर्भपाताचा गोरखधंदा करणारे डॉक्टर रुपाली चौगुले आणि तीचा पती विजय चौगुले हे दोघेही शासकीय सेवेत होते. या प्रकरणाची कुणकुण लागताच सांगली पोलिसांनी चौगुले हॉस्पिटलमध्ये छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि साहित्य तसेच मद्याच्या बाटल्या रुग्णालयात आढळून आल्या होत्या. याठिकाणाहून पोलिसांनी औषधीसाठा आणि रोख रक्कम जप्त केली.

हस्तगत करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर, या डॉक्टर दांम्पत्याने एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ बेकायदेशीर गर्भपात केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी रुपाली चौगुले आणि विजय चौगुले यां दोघांविरुद्ध आधीच गुन्हा दाखल केलाय. तपासणीदरम्यान हॉस्पिटल प्रशासनाकडून काही कागदपत्रे जाळण्याचाही प्रकार समोर आला होता.

सांगली महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी 10 पथके तयार केली आहेत. या पथकांद्वारे महापालिका क्षेत्रातील इतर रुग्णालयांचीही कसून तपासणी केली जातेय. सांगली जिल्ह्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील कोणत्याच आरोपीला पाठीशी घातले जाणार नसल्याचा इशारा आयुक्तांनी दिलाय.

 VIDEO : धनंजय मुंडेंच्या गणेश महोत्सवात सपना चौधरीचे ठुमके

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 07:00 PM IST

ताज्या बातम्या