S M L

सांगली : कृष्णा नदी पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधकार्य सुरू

कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने एका 14 वर्षीय मुलाला आत ओढून नेल्याची धक्कादायक घटना घडलीये.

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2018 04:34 PM IST

सांगली : कृष्णा नदी पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधकार्य सुरू

सांगली, 21 एप्रिल : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने एका 14 वर्षीय मुलाला आत ओढून नेल्याची धक्कादायक घटना घडलीये. नदीपात्रात या मुलाचा शोध सुरू आहे.

जिल्ह्यातील पळूस तालुक्यातील ब्रम्हणाळ इथं शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास कृष्णा नदीच्या पात्रात काही मुलं पोहत असताना, अचानक एका मगरीने 14 वर्षीय मुलाला पाण्यात ओढून नेलं. हा मुलगा बेळगावहून आपल्या मामाच्या गावी आला होता.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचं एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. या पथकाने बऱ्याच उशिरापर्यंत मुलाचा शोध घेतला. मात्र, अद्याप तरी या मुलाचा शोध लागलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2018 06:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close