सांगली मतमोजणी केंद्रावर गोंधळ, ४ हजार प्रतिनिधी थांबले गेटवरच

सांगली मतमोजणी केंद्रावर गोंधळ, ४ हजार प्रतिनिधी थांबले गेटवरच

सांगली महापालिकेच्या मतमोजणीला थोड्याचवेळात सुरूवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मतमोजणी केंद्रावर गोंधळ सुरू झालेला दिसतो

  • Share this:

सांगली, ०३ ऑगस्ट- सांगली महापालिकेच्या मतमोजणीला थोड्याचवेळात सुरूवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मतमोजणी केंद्रावर गोंधळ सुरू झालेला दिसतो. सुमारे ४ हजार प्रतिनिधींना पोलीस मतमोजणी केंद्रात आत सोडत नसल्यामुळे गोंधळ सुरू झालेला आहे. आता प्रतिनिधी गेटवर थांबले आहेत. दरम्यान सांगली- मिरज- कुपवाड आणि जळगाव महापालिकेचा आज थोड्याच वेळात निकाल लागणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दोन्ही महापालिकेच्या एकून १५३ जागांसाठी ७५४ उमेदवारांचा आज फैसला लागणार आहे. या निवडणुकीत सरासरी अंदाजे ५७ टक्के इतकं मतदान झालंय. यात सांगलीत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील तर जळगावात सुरेशदादा जैन या दोन दादांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेच्या २० प्रभागातील ७८ जागांसाठी ६२ टक्के तर जळगाव महापालिकेच्या १९ प्रभागातील ७५ जागांसाठी अंदाजे ५५ टक्के मतदान झालंय. सांगलीत ११ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप सह शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.

सांगली महापालिका निवडणूक २०१८ साठी एकूण ७८ जागासाठी ४५१ उमेदवार निवडणूक रिंगणात

काँग्रेस - ४४

राष्ट्रवादी - ३४

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी - ७८

भाजपा - ७८

शिवसेना - ५६

अपक्ष विकास महाआघाडी - ४३

स्वाभिमानी विकास आघाडी - २०

सांगली जिल्हा सुधार समिती - २१

हम भारतीय पार्टी - ३

एम आय एम - ८

जळगाव महापालिकेचं पक्षीय बलाबल एकूण जागा - ७५

खान्देश विकास आघाडी (सुरेशदादा जैन) - ३३

भाजप - १५

मनसे - १२

राष्ट्रवादी - ११

जनक्रांती पार्टी - ०२

महाराष्ट्र विकास आघाडी - ०१

अपक्ष - ०१

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2018 09:41 AM IST

ताज्या बातम्या