सांगली जिल्हा बँकेची 25 लाखांची रोकड लुटली; अधिकाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड

सांगली जिल्हा बँकेची 25 लाखांची रोकड लुटली; अधिकाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड

सांगलीमध्ये देखील दरोडेखोरांनी 25 लाखांची रोकड लंपास केली आहे. यावेळी त्यांनी रोकड नेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात मिरची फूड फेकली.

  • Share this:

सांगली, 14 जून : नाशिकमध्ये मुथुट फायनान्सवर पडलेली घटना ताजी असताना सांगलीमध्ये देखील अज्ञातांनी 25 लाखांची रोकड लंपास केली आहे. तासगाव - विसापूर रस्त्यावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 25 लाखांची रोकड लुटली. बँक कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्या डोळ्यात मिरची फूड फेकून मारहाण करीत चोरट्यांनी 25 लाखांची रोकड लंपास केली. रक्कम चोरल्यानंतर चोरटे ढवळीच्या दिशेने पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. विविध भागात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. तर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी, कर्मचारी तासगावामध्ये दाखल झाले आहेत.

कशी लुटली रोकड

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेचे दोन कर्मचारी आपल्या दुचाकीवरून तासगाव येथील बाजार समितीच्या आवारातील शाखेत पैसे नेण्यासाठी आले होते. तासगाव शाखेतून या कर्मचाऱ्यांनी 25 लाखांची रोकड घेतली. ही रोकड बॅगमध्ये घेऊन दोघेजण आपल्या दुचाकीवरून विसापूरकडे निघाले होते. दरम्यान,बँकेच्या या कर्मचाऱ्यांवर चोरट्यांनी पाळत ठेवली होती. बँकेचे कर्मचारी तासगावातून विसापूरकडे जात असताना चोरट्यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला.  बँकेच्या कर्मचाऱ्यांना तासगाव - विसापूर रस्त्यावर दरोडेखोरांनी अडवले.  त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यांच्या हातातील 25 लाख रुपये रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. यानंतर अवघ्या काही मिनिटात चोरटे ढवळीच्या दिशेने पसार झाले. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम तासगावात दाखल झाली आहे. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.


VIDEO: नाशिकमध्ये भरदिवसा गोळीबार करून सशस्त्र दरोडा

नाशिकमध्ये देखील सशस्त्र दरोडा

दरम्यान, नाशिकमधील उंटवाडीतील परिसरात मुथुट फायनान्सवर दरोडा टाकण्यात आला. 4 सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकत बँकेत गोळीबारही केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्य झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. तर भरदिवसा नाशिकमधील उंटवाडीतील हा थरार घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी त्वरीत हालचाल करत दरोडेखोरांचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे.


धनंजय मुंडे यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

काय म्हणाले विश्वास नांगरे – पाटील

दरोड्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील यांनी कोणताही मुद्देमाल चोरीला गेलेला नाही. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीनं आम्ही दरोडेखोरांना पकड्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत अशी प्रतिक्रिया दिली.


VIDEO : नाशिक सशस्त्र दरोड्यावर विश्वास नांगरे-पाटलांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 02:57 PM IST

ताज्या बातम्या