S M L

सांगली जिल्ह्यातून ग्रामपंचायतींसाठी ११७६ अर्ज दाखल

यात सरपंचपदासाठी १५६ तर सदस्यपदासाठी १०२० जणांचे अर्ज आले आहेत. सर्वाधिक अर्ज वाळवा तालुक्यात ४०३ अर्ज आले. बहुसंख्य तहसील कार्यालयांत उमेदवार, इच्छुक, समर्थक कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी होत आहे.

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2017 11:20 PM IST

सांगली जिल्ह्यातून ग्रामपंचायतींसाठी ११७६ अर्ज दाखल

27 सप्टेंबर : गावागावातील मिनी मंत्रालय असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज पाचव्या दिवशी शक्‍तिप्रदर्शनासह ११७६  अर्ज दाखल झाले. यात सरपंचपदासाठी १५६  तर सदस्यपदासाठी १०२० जणांचे अर्ज आले आहेत. सर्वाधिक अर्ज वाळवा तालुक्यात ४०३  अर्ज आले. बहुसंख्य तहसील कार्यालयांत उमेदवार, इच्छुक, समर्थक कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी होत आहे.

बहुसंख्य ठिकाणी सर्व्हर डाऊनच्या तक्रारी होत्या. त्यामुळे उमेदवार चांगलेच वैतागले आहेत. सेतु केंद्राबाहेर दिवसभर ताटकळत बसलेले उमेदवार कंटाळून गेल्याचे दिसत होते. अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ तीन दिवसच उरले आहेत. शिराळा तालुक्यात सरपंचपदासाठी १५  तर सदस्यांसाठी ४४  असे  एकूण ५९  जण उमेदवार इच्छुक  आहेत. वाळवा तालुक्यात सरपंच पदासाठी ५३ तर सदस्यपदासाठी ३५०  असे एकूण ४०३  अर्ज आले आहेत. पलूस तालुक्यात  सरपंच होण्यासाठी ५  तर सदस्यपदासाठी २६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

कडेगाव तालुक्यात ४३  ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाकरता ७ तर सदस्य पदासाठी ४४  उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज अखेर सरपंचपदासाठी  २५ तर सदस्यपदासाठी १२७ अर्ज दाखल झाले. तालुक्यातील मोहिते वडगाव, देवराष्ट्रे, आसद, तडसर, कडेपूर, खेराडे वांगी, भिकवडी खुर्द, आंबेगाव, नेवरी, बोंबळेवाडी, करांडेवाडी, सोहोली, उपाळे मायणी, वांगी, वडियेरायबाग या गावांमधून इच्छुकांनी शक्तीप्रदर्शनासह अर्ज दाखल केले.

तासगाव तालुक्यात सरपंच पदासाठी ७  गावांतून ११  उमेदवारी अर्ज दाखल झाले. सदस्य पदासाठी १५  गावातून १०४  उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजअखेर सरपंचपदासाठी ३९  तर सदस्य पदासाठी २०५ उमेदवारी अर्ज दाखल आले आहेत. वायफळे, योगेवाडी, सावर्डे, कचरेवाडी, पुणदी, नागाव (नि), बेंद्री आणि भैरववाडी या आठ गावातून एकही अर्ज दाखल झालेला नाही. मिरज तालुक्यात २०  जणांनी सरपंच पदासाठी व १७६   जणांनी सदस्य पदासाठी अर्ज दाखल केलेआहेत.

कवठेमहांकाळ तालुक्यात २९  सदस्यांसाठी ५६  आणि सरपंच पदासाठी ४ अर्ज आज दाखल झाले.  आज अखेर सदस्यांसाठी एकूण १३६  आणि सरपंच पदासाठी २०  अर्ज दाखल झाले. खानापूर तालुक्यात सरपंच पदासाठी १४ व सदस्यांसाठी ४४ अर्ज आले आहेत. आटपाडी तालुक्यात तीन गावातून सरपंच पदासाठी ४  तर सदस्यपदासाठी ९  गावांतून ४१  अर्ज आले. जत तालुक्यात सरपंचसाठी २३  व सदस्यांसाठी १४४  जणांनी उमेदवारी दाखल केली. शुक्रवार ( दि. २९ ) रोजी अंतिम दिवस असल्याने पुढील दोन-तीन दिवसांत अधिक गर्दी होणार आहे.

Loading...
Loading...

दरम्यान, थेट सरपंच निवडीच्या निर्णयामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी निवडणूक लढवण्यास बरीच मंडळी इच्छुक नसल्याच दिसत आहेत. तर सरपंच पदासाठी गटागटातुन एकमत करताना नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे. त्यामुळेच अद्यापही काही गावातुन एकही अर्ज दाखल झालेले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 11:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close