सांगलीत लोकांच्या जिवाशी खेळ, पाण्याबाबत धक्कादायक माहिती समोर

तब्बल 450 ठिकाणी पाण्याची बेकायदा विक्री असल्याची माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 01:01 PM IST

सांगलीत लोकांच्या जिवाशी खेळ, पाण्याबाबत धक्कादायक माहिती समोर

सांगली, 2 मे : स्वच्छ आणि थंडगार पाण्याची सोय करून देण्याच्या नावाखाली जार बाटल्यांची तब्बल 450 धोकादायक दुकानं सांगलीमध्ये पाणी पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील मोजकीच दुकानं ही सरकारी नोंदणीकृत आहेत. तब्बल 450 ठिकाणी पाण्याची बेकायदा विक्री असल्याची माहिती आहे.

जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर या दुष्काळी तालुक्यांसह सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात ड्रिंकिंग वॉटर कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र काही मोजक्याच कंपन्या सोडल्या तर अन्य कंपन्यांकडून कोणतीही गुणवत्ता राखली जात नसल्याची तक्रार वारंवार होत आहे. ड्रिंकिंग वॉटर कंपन्या स्थापन करताना परवानग्या घेणे, तसंच मान्यताप्राप्त कंपन्यांमधून पाण्याची विक्री होणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी बाटलीबंद पाण्याचा धंदा विनापरवाना करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये सध्या बाटलीबंद पाण्याचा व्यवसायामध्ये सुमारे 350 ते 450 बेकायदा कंपन्या कार्यरत असून त्यांच्याकडून पाण्याचा गोरखधंदा सुरू आहे. एका नोंदणीकृत ड्रिंकिंग वॉटर कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात 250 पॅकेज ड्रिंकिंग वॉटर कंपन्या विनापरवाना सुरू असल्याचं समोर आले. त्यामुळे नोंदणीकृत कंपन्यांना त्याचा फटका ही बसत आहे. शिवाय नागरिकांच्या आरोग्याला या मिनरल वॉटरमुळे हानी पोहचत असल्याचं समोर येत आहे.

एफडीए ( अन्न औषध प्रशासन ) कडून हे तपासणे गरजेचे आहे. बंद पाण्याच्या बाटलीत क्लोरोफार्मची मात्रा, तसंच पाण्यातील हानीकारक जीवाणूचे प्रमाण किती तसेच पाण्याची स्थिती आणि पाणी ज्या ठिकाणाहून आणले त्या स्त्रोत चांगला होता की नाही, याची देखील माहिती असणे गरजेचे असते. मात्र असे होताना दिसून येत नाही. विनापरवाना छोटे छोटे व्यवसाय दुकान काढून पाणी वाटप सुरू आहे. याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे..

दिवसाला 265 लिटर पाण्याचे जार अथवा पाण्याच्या बाटल्या पॅकिंगच्या निर्मितीसाठीची परवानगी आहे. परंतु बहुतांश मोठ्या कंपन्यांकडून दररोज दोन हजार लिटरहून अधिक पाण्याची निर्मिती होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या परवाना आवश्यक आहे. आणि पॅकेजिंग केल्यानंतर 48 तास ठेवले जाते त्यानंतर भारतीय मानक ब्यूरो आयएएस आणि अन्नसुरक्षा कायद्यानुसार पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी स्वतःची प्रयोगशाळा असावी लागते. त्याशिवाय पाण्याचे उत्पादन करता येत नाही. मात्र या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

Loading...


VIDEO : 'लेक आणि नातू हरणार याचं पवारांना दु:ख', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 08:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...