सांगली जिल्ह्यात गारपीट; शेकडो एकर शेती उद्ध्वस्त!

सांगली जिल्ह्यात गारपीट; शेकडो एकर शेती उद्ध्वस्त!

गारपीट आणि वादळी वाऱ्यासह सांगली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जत तालुक्यातील शेकडो एकरवरील शेती उद्ध्वस्त झालीय. तर द्राक्ष, डाळिंब, मका आणि हळद पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

  • Share this:

सांगली, 26 ऑक्टोबर : गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं गुरुवारी सायंकाळी सांगली जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं. दुष्काळी भाग म्हणून अोळख असलेल्या जत या तालुक्यातील बागेवाडी, घाटगेवाडी इथं गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळं द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळं रामपूर, बागेवाडी, कंठी, येळदरी परिसरातील शेकडो एकरवरील शेती उद्ध्वस्त झालीय. तर द्राक्ष, डाळिंब, मका आणि हळद पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

गुरुवारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळं या भागातले दोन तलाव भरून वाहू लागलेत. तर अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून काही घरांची पडझडही झालीय. या पावसामुळं अंदाजे 6 ते सात कोटी रूपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश्य तालुक्यात समावेश असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झालाय. यामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जतपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटगेवाडी आणि रामपूर गावाच्या उत्तरेस गुरुवारी सायंकाळी अचानक गारपीट झाली. यामुळे द्राक्षबागेतील पाने गळून पडली असून द्राक्षबागाच्या काड्याचे देखील मोठे नुकसान झाले. यामुळे द्राक्ष बागांचा यंदाचा हंगाम वाया जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाऊसामुळे रामपूर, बागेवाडी, कंठी, येळदरी, मल्हाळ यांसह परिसरातील शेकडो एकर क्षेत्रावरील शेती उध्वस्त झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्षबागा, डाळींब, मका आणि हळद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनके ठिकाणी द्राक्षबागा या वादळी गारपीठीमुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. तर दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असलेल्या या भागातील दोन तलाव गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे भरून गेले आहेत.

पावसामुळे या भागातील अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून, काही घरांची पडझड झाली आहे. या पाऊसामुळे या भागातील ६ ते ७ कोटी रुपयांचे अंदाजे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. या घटनेनंतर महसूल प्रशासनाकडून तात्काळ पंचानामे सुरू करण्यात आले आहेत. तर आधीच दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या शेतकरयांना गारपीटीने पुरते उध्वस्त करून टाकले असून, तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

 LIVE CCTV: तो चोरट्या पावलांनी आला आणि 1 लाखाची रोकड घेऊन गेला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2018 06:02 PM IST

ताज्या बातम्या