S M L

मानलं सरपंचांना !, 10 लाखांचं कर्ज काढून गावात बांधले शौचालय

सांगलीच्या सिद्धेवाडीचे सरपंच पंचाक्षर जंगम. सरकारी योजनांबरोबर हागणदारीमुक्तीसाठी त्यांनी स्वत:च्या नावावर दहा लाखांचं कर्जही काढलंय

Sachin Salve | Updated On: Apr 10, 2017 08:44 PM IST

मानलं सरपंचांना !, 10 लाखांचं कर्ज काढून गावात बांधले शौचालय

आसिफ मुरसल, सांगली

10 एप्रिल : लोकप्रतिनिधी व्हायचं तर पैसे कमवायला असा एक गैरसमज आपल्याकडे रुढ होत चाललाय. त्यात गावचा सरपंच झाला की, मग त्याचा रुबाब गावाला भारी....मात्र काही लोकप्रतिनिधी ध्येयानं पछाडलेले असतात. त्यापैकीच एक सांगलीच्या सिद्धेवाडीचे सरपंच पंचाक्षर जंगम. सरकारी योजनांबरोबर हागणदारीमुक्तीसाठी त्यांनी स्वत:च्या नावावर दहा लाखांचं कर्जही काढलंय. त्यातून जंगम यांनी हागणदारीमुक्तीचा सिद्धेवाडी पॅटर्न तयार केलाय.

सांगलीच्या तासगाव तालुक्यातली सिद्धेवाडी...जवळपास 5 हजार लोकवस्तीचं गाव...हे गाव संपूर्ण हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेच्या बाबतीतही अव्वल आहे. या गावानं हागणदारी मुक्तीचा नवा सिद्धेवाडी पॅटर्न राज्यासमोर ठेवलाय. याचं श्रेय जातं गावकरी आणि गावचे सरपंच पंचाक्षर जंगम यांना..पंचाक्षर जंगम या गावाला लाभलेला युवा सरपंच..घरची परिस्थिती जेमतेम...धड घरही नाही. पण या पठ्ठय़ानं गावाला विकासाच्या दिशेनं न्यायचं ठरवलं आणि लिलया पेललं ही.. शासकीय योजना राबवून जेव्हा निधी कधी पडला तेव्हा पंचाक्षर जंगम यांनी स्वतःच्या नावावर 10 लाखांचं कर्ज काढून शौचालयं बांधायला सहकार्य केलं.

आता गावकरीही सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या कामावर खूष आहेत.

गाव करील ते राव काय करील अशी म्हण आहे. मात्र याच गावाला गरज असते एका नेतृत्वाची. आणि तिच सिद्धेवाडीला लाभलीय सरपंच पंचाक्षर जंगम यांच्या रुपाने...विकासाचा ध्यास घेतलेलं हे गाव खरंच सर्वांसाठी एक आदर्श आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 07:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close