News18 Lokmat

अनिकेत कोथळेच्या हत्येनिषेधार्थ सांगलीकरांची बंदची हाक

सांगलीत पोलीसच खाकीच्या आडून गुन्हे करू लागल्यानं सांगलीकरांमध्ये तीव्र संताप आहे. दोषींवर कारवाईची मागणी करत सांगलीकरांनी बंदची हाक दिलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 12, 2017 09:09 PM IST

अनिकेत कोथळेच्या हत्येनिषेधार्थ  सांगलीकरांची बंदची हाक

12 नोव्हेंबर : सांगलीत पोलीसच खाकीच्या आडून गुन्हे करू लागल्यानं सांगलीकरांमध्ये तीव्र संताप आहे. दोषींवर कारवाईची मागणी करत सांगलीकरांनी बंदची हाक दिलीय.

सांगलीतल्या अनिकेत कोथळेच्या खुनामुळे पोलिसांच्या वर्दीला डाग लागलाय. गुंड जे काही करतात ते सगळं सांगली पोलिसांनी केलंय. अनिकेत कोथळेचा खून आणि त्याअगोदरची वारणानगरची लूट पाहता पोलिसांनी गुंडांना करण्यासाठी कोणतंच काम सोडलेलं दिसत नाहीये. पोलीसच गुन्हेगार झाल्यानं जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय. अनिकेतच्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीकरांनी बंदची हाक दिलीये.

दरम्यान, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज पीडित कोथले कुटुंबीयांची भेट घेतली. अनिकेतच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी घेतली. अनिकेतची हत्या झाल्यानंतर आज दीपक केसरकर यांनी सांगलीत जाऊन कोथले कुटुंबीयांचं सांत्वन केलं. अनिकेतच्या हत्येतल्या आरोपींवर योग्य कारवाई झाली नाही तर सामूहिक आत्मदहनाचा इशारा कोथले कुटुंबीयांनी दिलाय.

सांगलीतल्या विश्रामबाग पोलिसांनी चोरीप्रकरणात अनिकेतला पकडलं होतं. पोलीस कोठडीत केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनिकेत कोठडीतून पळून गेल्याचा बनाव केला. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यानं अनिकेतचा मृतदेह थेट आंबोलीत नेऊन जाळला. धक्कादायक बाब म्हणजे एकदा मृतदेह जळला नाही म्हणून दुसऱ्यांदा जाळण्यात आला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 09:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...