शिरपूरमध्ये वाळू माफियांची दहशत, प्रांताधिकाऱ्यांना बेदम मारहाण

शिरपूरमध्ये वाळू माफियांची दहशत, प्रांताधिकाऱ्यांना बेदम मारहाण

शिरपूर शहरात वाळू माफियांचा सुळसुळाट झाला आहे. अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविल्याने माफियांनी शिरपूरचे प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

दीपक बोरसे, (प्रतिनिधी)

धुळे, 11 जुलै- शिरपूर शहरात वाळू माफियांचा सुळसुळाट झाला आहे. अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविल्याने माफियांनी शिरपूरचे प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. बांदल यांची प्रकृती स्थीर असून या मारहाणी प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तीन-चार अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रातांधिकारी डॉ.विक्रांत बांदल तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला जात असताना वाळू माफियांनी त्यांना बेदम मारहाण केली. शहरातील आकाश गार्डनजवळ गुरुवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. प्रातांधिकारी डॉ.बांदल यांना आकाश गार्डनजवळ वाळूने भरलेले ट्रॅक्टर दिसले. त्यांनी गाडी थांबवून ट्रॅक्टर अडविले. ट्रॅक्टरसोबत असलेल्या तीन-चार जणांनी डॉ.बांदल यांच्यावर हल्ला केला. नंतर हल्लेखोर ट्रॅक्टर घेऊन पसार झाले.

डॉ.बांदल यांनी तहसील कार्यालयात जाऊन झालेला सगळा प्रकार अप्पर जिल्हाधिकारी बेडसे यांना सांगितला. ग्रामीण रुग्णालयात डॉ. बांदल यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आल्यानंतर शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडीतलं पेट्रोल काढून मुलाने आईला जिवंत जाळलं!

जन्मदात्या आईला जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्याला 9 महिने पोटात वाढवणाऱ्या आईला मुलानेच जिवंत जाळल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे महिला यामध्ये गंभीररित्या भाजली आहे. तर शेजाऱ्यांच्या मदतीमुळे तिच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला संगम पार्कमध्ये राहणारी आहे. मोहन असं तिच्या मुलाचं नाव आहे. घरात झालेल्या वादामुळे तरुणाने गाडीतलं पेट्रोल काढून त्याने आईला जिवंत जाळलं. दरम्यान, मोहन आणि त्याची पत्नी नोकरी करतात. त्यांची 13 वर्षांची मुलगी आहे. आई नातीची नीट काळजी घेत नसल्यामुळे त्यांच्या घरात सतत वाद होत होते. त्यातून हा प्रकार झाला असल्याचा आरोप खुद्द आरोपी मोहन याने केला आहे.

हे संपूर्ण प्रकरण गाजियाबादच्या खोडा ठाणे परिसरातलं आहे. नातीला आई नीट सांभाळत नसल्यामुळे त्यांच्या घरात रोज वाद होत होता. या सगळ्या प्रकरण इतकं वाढलं की, मोहनला दारू पिण्याचं व्यसन लागलं. त्यानंतर त्याने दारूच्या नशेत आईला मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. वाद टोकाला गेल्यानंतर मोहनला राग अनावर झाला आणि त्यानंतर त्याने आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

रागाच्या भरात मोहनने घराच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीतून पेट्रोल काढलं आणि ते आईच्या अंगावर ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आईने आरडाओरड सुरू केल्यानंतर शेजारी धावत आले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवल्यानंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून करण्यात आली आहे.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तपासाअंतर्गत आरोपी मोहनवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलं. तर पोलीस आता प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

VIDEO: भरधाव कारची दुकानाला धडक, अपघाताची घटना CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2019 04:04 PM IST

ताज्या बातम्या