S M L

'संभाजी महाराज दारूच्या कैफात सापडले होते', सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात उल्लेख

Updated On: Oct 11, 2018 07:52 PM IST

'संभाजी महाराज दारूच्या कैफात सापडले होते', सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात उल्लेख

पुणे,11 आॅक्टोबर : सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडने पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयात दारूच्या बाटल्या नेऊन अनोखं आंदोलन केलं.

'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात हा आक्षेपार्ह मजकूर आहे. 'संभाजी महाराज दारूच्या कैफात सापडले होते, अष्टप्रधान मंडळातल्या थोर मंडळींची संभाजी महाराजांनी न भूतो न भविष्यती अवस्था केली होती' असा उल्लेख या पुस्तकात आहेत. यामुळे संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झालीय.

पुण्यात याचमुद्दयावरुन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण आयुक्तालयात दारूच्या बाटल्या नेऊन आंदोलन केलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलावर दारुच्या बाटल्या ठेवल्या.

Loading...
Loading...

तसंच या पुस्तकाच्या लेखिका शुभा साठे,लाखे प्रकाशन आणि शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाईची अशी मागणी ब्रिगेडने केलीय.

काय आहे मजकूर?

रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या-खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारूच्या कैफात व कुलशाच्या जाळ्यात सापडला होता. त्याने अष्टप्रधानमंडळातील थोर थोर मंडळींची 'न भूतो न भविष्यती' अशी अवस्था केली होती. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांच्या संभाजीराजांना एक प्रदीर्घ पत्र लिहिले. संभाजीराजांनी पत्र वाचले. 'आज्ञाप्रमाणे वागेन' असा समर्थांना निरोप पाठविला.

==================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 07:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close