मनूने जगाला पहिली घटना दिली- संभाजी भिडे

मनूने जगाला पहिली घटना दिली असून त्याच्या सावलीजवळ जाण्याची आपली लायकी नसल्याचं भिडे गुरुजींनी धुळ्यातील सैनिक भवनात पार पडलेल्या सभेत सांगितले.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 29, 2018 09:48 AM IST

मनूने जगाला पहिली घटना दिली- संभाजी भिडे

धुळे, 29 मे : नंदुरबार पाठोपाठ धुळ्यातही संभाजी भिडे गुरुजींनी वादग्रस्त विधान करत खळबळ माजवून दिली आहे. मनूने जगाला पहिली घटना दिली असून त्याच्या सावलीजवळ जाण्याची आपली लायकी नसल्याचं भिडे गुरुजींनी धुळ्यातील सैनिक भवनात पार पडलेल्या सभेत सांगितले.

मनुस्मृतीचे नाव मानवधर्मशास्त्र असून अनेकांना मनूवर टीका करण्यात आनंद मिळत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. निधर्मीपणा हा नालायकपणा असून सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता या संकल्पना थोतांड असून या संकल्पनांची त्यांनी चांगलीच टर उडवली. जगातील सर्व शस्त्रांचा जन्म भारतात झाला असून सर्व तत्त्वज्ञानाचा उगम भारत असल्याचे सांगत त्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही यावेळी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2018 09:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...