S M L

सदाभाऊंचा शेतकरी मेळावा, तर राजू शेट्टींचा आत्मक्लेश

सदाभाऊंना शेतकरी संघटनेतल्या त्या आंदोलनापेक्षा सत्ताच जास्त सुखकर वाटायला लागली आणि मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपल्याच सरकार विरोधात आंदोलनं करावी लागली आणि या आंदोलनांकडे सदाभाऊंनी पाठ फिरवली.

Sonali Deshpande | Updated On: May 29, 2017 02:02 PM IST

सदाभाऊंचा शेतकरी मेळावा, तर राजू शेट्टींचा आत्मक्लेश

29 मे : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यभरात रान उठवणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना. गेल्या अनेक सरकारांना सळो की पळो करून सोडणारे संघटनेचे दोन शिलेदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत.मात्र या संघटनेत आता उभी फूट पडतेय. स्वाभिमानीचा एक मंत्री शेतकरी मेळावा घेतोय तर अध्यक्ष आत्मक्लेश करतोय. त्यामुळे रस्त्यावरची संघटना सत्तेत आली की काय महाभारत घडतंय ते दिसतंय.

सत्तेसाठी काहीही असं म्हटलं जातं. भल्याभल्यांना या सत्तेचा मोह सुटला नाही. कुटुंबच्या कुटुंबं सत्तेपायी एकमेकांसमोर उभी ठाकली. त्यात संघटना आणि पक्षांचं तर सोडाच.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या अनेक सरकारांना भंडावून सोडणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना. शेतकऱ्यांसाठी महायुतीत सामील झाली. तोपर्यत सारं काही आलबेल होतं.

कालांतराने सदाभाऊ खोत मंत्री झाले आणि तिथेच माशी शिंकली. मग काय सदाभाऊंना शेतकरी संघटनेतल्या त्या आंदोलनापेक्षा सत्ताच जास्त सुखकर वाटायला लागली आणि मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपल्याच सरकार विरोधात आंदोलनं करावी लागली आणि या आंदोलनांकडे सदाभाऊंनी पाठ फिरवली.रस्त्यावरच्या संघटना सत्तेत आल्या की काय होतं याचं उदाहरण जर सांगायचंच झालं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सांगता येईल. कारण आंदोलनं, संघर्ष हाच या संघटनांचा श्वास आहे आणि सत्तेत गेल्यावर आंदोलनं करता येत नाहीत. आणि मग संघटनांचा श्वास कोंडायला लागतो. त्यातूनच तर राजू शेट्टींनी आत्मक्लेश यात्रेला सुरूवात केली. अर्थात त्यामागे स्वतःचं अस्तित्व टिकवणं हाही एक उद्देश आहेच म्हणा तर सदाभाऊंचा आंदोलनातून सत्तेकडचा हा प्रवास पाहिला तर सत्ता आवडे सर्वांना असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2017 02:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close