मी अल्टीमेटम बघून काम करत नाही-सदाभाऊ खोत

मी अल्टीमेटम बघून काम करत नाही-सदाभाऊ खोत

मंत्रिपदासंदर्भात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने राजू शेट्टींनी सदाभाऊ खोत यांना 4 जुलैपर्यंत अल्टीमेटम दिला होता. त्यावर मी कधीच अल्टीमेटम बघून काम करत नाही असा प्रतिटोला सदाभाऊ खोत यांनी लगावलाय

  • Share this:

कराड, 30जून : स्वामिमानी संघटनेचे जय-वीरू असलेले सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातला संघर्ष आता आणखीच टोकदार बनलाय.

मंत्रिपदासंदर्भात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने राजू शेट्टींनी सदाभाऊ खोत यांना 4 जुलैपर्यंत अल्टीमेटम दिला होता. त्यावर मी कधीच अल्टीमेटम बघून काम करत नाही असा प्रतिटोला सदाभाऊ खोत यांनी लगावलाय. मी माझे काम टार्गेटच्या आधीच पूर्ण करतो, अल्टीमेटम हा कामाची वेळ निघून गेलेल्यांना दिला जातो. त्यामुळे अल्टीमेटम मी कधीच चिंता करत नाही असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात कार्यकारिणी झाली त्यात सदाभाऊ खोत यांच्याकडे पक्षाच्या ध्येयधोरणांविरोधात भूमिका मांडल्याबद्दल 4 जुलैपर्यंत बाजू मांडण्याचे आदेश दिले गेले होते. तसंच यापुढे सदाभाऊंची भूमिका ही संघटनेची अधिकृत मानली जाणार नाही, यापुढे फक्त राजू शेट्टी आणि पक्ष प्रवक्ते हेच संघटनेतर्फे अधिकृत मांडतील असा ठराव करण्यात आला होता. त्यावर सदाभाऊंनी मी अल्टीमेटम बघून काम करत नसल्याची प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सदाभाऊ खोत यांच्यातली दरी आणखीच वाढत चाललीय. असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 08:13 PM IST

ताज्या बातम्या