हातकणंगले मतदारसंघ तुमची जहागिरी आहे का ?, सदाभाऊंचा घणाघात

हातकणंगले मतदारसंघ तुमची जहागिरी नाहीये. त्यामुळे आपण कोल्हापूर-सांगली जिल्हे सोडून निवडणूक लढवूया, असं खुलं आव्हान सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2017 12:50 PM IST

हातकणंगले मतदारसंघ तुमची जहागिरी आहे का ?, सदाभाऊंचा घणाघात

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

21 आॅगस्ट : हातकणंगले मतदारसंघ तुमची जहागिरी नाहीये. त्यामुळे आपण कोल्हापूर-सांगली जिल्हे सोडून निवडणूक लढवूया, असं खुलं आव्हान सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिलंय. तसंच

राजू शेट्टींचा आत्मक्लेश हा 'सदाभाऊ क्लेश' होता अशी घणाघाती टीकाही खोत यांनी केली.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊसाच्या मुद्यावरुन राजकारणाला सुरुवात केली. पण आता स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि याच पक्षातल्या सदाभाऊ खोत यांच्यात मतभेद झाले आणि खोत यांची स्वाभिमानी यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरू झालीय.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या रुकडी गावात एका कार्यक्रमात राज्यमंत्री खोत यांनी खासदार शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केलीये. हातकणंगले मतदारसंघ तुमंची जहागिरी नाहीये. त्यामुळे आपण कोल्हापूर सांगली जिल्हे सोडून निवडणूक लढवूया असा खुलं आव्हान खोत यांनी शेट्टी यांना दिलंय.

Loading...

मंत्रिपद मिळालं म्हणून तुमचं पोट का दुखलं ?

घरातलं एखादं माणूस मोठं झालं की, घरातल्या माणसाच्या पोटातही दुखतं. मला फक्त 1 वर्ष मंत्रीपद मिळालं. त्यात 6 महिने माझे दवाखान्यात गेले तरीही माझाविरोधात सोशल मीडियावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मी एक बोट लावल्यावर गुदगुल्या होतात. तर मग मी 6 महिने कसं सहन केलं असेल असा सवाल राज्यमंत्री खोत यांनी केलाय. मला पक्षातून काढल्यावर मी दुसरीकडं बोलतो मग मला माळावर बोंबलायलाही यांची परवानगी लागते का असा सवालही खोत यांनी शेट्टी यांना विचारलाय.

'युनो'ची समिती होती का ?

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानीच्या एका समितीनं चौकशी केली आणि त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली. पण याच चौकशी समितीवर खोत यांनी निशाणा साधत त्यांच्यावर जोरदारी टीका केलीये. माझी चौकशी करणारी समितीही युनोची होती का ? अशी टीका खोत यांनी केली.

राजू शेट्टींचे विरोधक एकत्र

विशेष म्हणजे राजू शेट्टी यांच्याच मतदारसंघात आज शेट्टी यांचे सगळे विरोधत एकत्र आले होते. माजी खासदार निवेदिता माने, शिरोळचे आमदार उल्हास पाटील, यांच्यासह या भागातील नेते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे शेट्टी यांच्याविरोधात आतापासूनच कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय मोट बांधली जातेय असंच चित्र सध्या तरी दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 12:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...