आता झेंडाही आपलाच,सदाभाऊंनी दिले नव्या संघटनेचे संकेत

आता संघटनेला पूर्णविराम, आता झेंडाही आपलाच आणि काठीही आपलीच आणि दोरीही आपलीच अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी घेतली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2017 06:28 PM IST

आता झेंडाही आपलाच,सदाभाऊंनी दिले नव्या संघटनेचे संकेत

21 जुलै : स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटणार आता हे निश्चित झालंय. आता संघटनेला पूर्णविराम, आता झेंडाही आपलाच आणि काठीही आपलीच आणि दोरीही आपलीच अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी घेतली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वादाचा अंक अखेरच्या टप्प्यात पोहचलाय. राजू शेट्टी यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीसमोर सदाभाऊ खोत अखेर हजर झाले.  माझी मुख्य नेतृत्वाशी चर्चा करायची तयारी आहे. समितीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. आता ही पहिली आणि शेवटची चौकशी आहे. यानंतर वादावर बोलणार नाही जो निर्णय असेल तो समितीने घोषित करा असं आवाहनही सदाभाऊंनी दिलं.

तसंच माझी बदनामी करणाऱ्या नेतृत्वाच्या जवळच्या लोकांना मी माझी बदनामी केली तरी मोठ्या मनाने माफ केलंय. मला कुणाबद्दलही आकस नाही असंही सदाभाऊ म्हणाले.

ऑगस्टमध्ये राज्याचा दौरा करणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय. जर राजू शेट्टींनी निर्णय घेतला तर सदाभाऊ या दौऱ्यादरम्यान नवीन संघटनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2017 06:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...