दत्तक घेतलेल्या डोंजा गावाला सचिननं दिली भेट, 'मास्टर ब्लास्टर' खेळला क्रिकेट

दत्तक घेतलेल्या डोंजा गावाला सचिननं दिली भेट, 'मास्टर ब्लास्टर' खेळला क्रिकेट

दत्तक घेतलेल्या गावातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरनं उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजामध्ये आज भेट दिली आहे. तो डोंजात मुलांसोबत क्रिकेटही खेळला.

  • Share this:

19 डिसेंबर : खासदार दत्तक ग्राम योजनेमध्ये दत्तक घेतलेल्या गावातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरनं उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजामध्ये आज भेट दिली आहे. तो डोंजात मुलांसोबत क्रिकेटही खेळला. सचिन आपल्या गावात येणार म्हणून डोंजा ग्रामस्थांबरोबरच जिल्ह्यामध्येही प्रचंड उत्सुकता होती. मागे एकदा सचिनचा उस्मानाबादचा दौरा विकासकाम न झाल्यामुळे रद्दा झाला होता ,त्यावेळेस त्याने एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता पण आता मात्र त्याने या गावाच्या विकासकामाची पाहणी केली आहे.

राज्यसभा सदस्य असणाऱ्या सचिन तेंडुलकरने जिल्ह्यातील डोंजा गाव दत्तक घेतल आहे. त्याच्या खासदार निधीतून गावामध्ये विविध विकासकामं करण्यात येणार आहेत. सचिननेही या गावाचा चेहरामोहरा बदलण्याचं आश्वासन दिलं आहे, मात्र त्याच्या निधीतून कामांसाठी पैसा खर्च करण्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे सचिननेच त्याची दखल घेत काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे विचारणा केली होती आणि आज त्याने या गावातील विकासकामांची पाहणी केली आहे.

डोंजाला निघण्यापूर्वी सचिननं एक व्हिडिओही पोस्ट केला होता. त्यात सचिन म्हणाला की, 'मी डोंजा गाव दत्तक घेतल्यापासून माझी इच्छा होती की मी या गावाल भेट देऊन सगळ्या गावकऱ्यांना भेटाव ,त्यांच्यासोबत वेळ घालवावा. त्यामुळे आज माझी इच्छा पूर्ण होणार आहे. मी फार उत्सुक आहे. आपण लवकरच भेटूयात.'

त्यामुळे सचिनसोबतच अवघ डोंजा गाव सचिनसाठी उत्सुक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2017 12:15 PM IST

ताज्या बातम्या