मराठा उपसमितीच्या निर्णयावर 'सामना'तून टीका !

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आजच्या सामनातून मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका करण्यात आलीये. मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमून सरकारे वेळकाढू धोरणाचा काँग्रेसी मार्ग अवलंबल्याची टीका सामनातून करण्यात आलीये. '

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2017 09:15 AM IST

मराठा उपसमितीच्या निर्णयावर 'सामना'तून टीका !

मुंबई, 16 सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आजच्या सामनातून मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका करण्यात आलीये. मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमून सरकारे वेळकाढू धोरणाचा काँग्रेसी मार्ग अवलंबल्याची टीका सामनातून करण्यात आलीये. '

'तागडीवाल्यांच्या राज्यात देशासाठी तलवार चालविणा-यांवर माती खाण्याची वेळ आली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचा टाइमपास उपक्रम नक्की किती काळ चालणार आहे?' असा प्रश्नही सामनातून विचारण्यात आलाय. लढवय्या जमातीची कदर केली गेली नाही तर व्यापार आणि इस्टेटीचे राजकारण टिकणार नाही. जपानच्या पंतप्रधानांच्या रोड शोनंतर अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा शिलान्यास होतो, पण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या अनेक आणि प्रचंड रोड शोनंतर त्या समाजाच्या मागण्यांसाठी एका उपसमितीचे घोंगडे फेकले जाते. असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं.

विशेष म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीमध्ये एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते या शिवसेनेच्याही दोन मंत्र्यांचाही समावेश आहे. तरीही सामनातून मराठा उपसमिती स्थापन करण्यावर का टीका करण्यात आलीय, हे भाजपसाठी काहिसं समजण्यापलीकडचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 09:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...