News18 Lokmat

जळगावात मतदान सुरू असताना एका वाहनात सापडल्या नोटा

भुसावळ येथील भाजपाचे आमदार संजय सावकारे यांचे भाऊ प्रमोद सावकारे यांच्या मालकीचे असलेले हे वाहन रामानंद पोलिसांनी जप्त केले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2018 06:18 PM IST

जळगावात मतदान सुरू असताना एका वाहनात सापडल्या नोटा

जळगाव, 1 ऑगस्ट : जळगाव महापालिकेसाठी मतदान सुरू असताना शहरातील समतानगर भागात एका वाहनात मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ येथील भाजपाचे आमदार संजय सावकारे यांचे भाऊ प्रमोद सावकारे यांच्या मालकीचे असलेले हे वाहन रामानंद पोलिसांनी जप्त केले आहे.

जळगावात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर समतानगर भागात स्टेट बँक कॉलनी येथे भुसावळ नगर परिषदेच्या सार्वजनीक बांधकाम विभाग सभापती असा फलक असलेली एम.एच. १९, बीडी ४१४१ या क्रमांकाची कार उभी होती. संशय आल्याने नगरसेवक नितीन बरडे यांनी या बाबत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता, त्यात मोठी रक्कम आढळून आली. पोलिसांनी हे वाहन जप्त केले आहे. ही कार भुसावळ येथील भाजपाचे आमदार संजय सावकारे यांचे भाऊ प्रमोद सावकारे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर येत आहे. कारमध्ये सापडलेली रक्कम किती होती याबाबत अद्याप पोलिसांनी खुलासा केलेला नाही.

जळगावमध्ये सकाळी 11 पर्यंत 22 टक्के मतदान झाले

जळगाव आणि सांगली मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान झाले. दोन्ही महानगरपालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी 5.30 वाजता मतदान पार पडले.

निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसची राष्ट्रवादीसोबत आघाडी आहे. तर भाजप, सेना, जिल्हा सुधार समिती, आप, आणि अपक्षांसह 457 उमेदवार आपलं नशिब आजमावताहेत. मतदारांची संख्या सुमारे 4 लाख 23 हजार 366 इतकी आहे. जळगाव महापालिकेत एकून 19 प्रभागातील 75 जागांसाठी मतदान पार पडलं. जळगाव जिल्हा हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला असल्यानं या ठिकाणी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीये. येत्या 3 ऑगस्टला या दोन्ही महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे.

Loading...

हेही वाचा..

'जख्मी जूतों का हस्पताल'ला आनंद महिंद्रांचं नवजीवन

दलित संघटनांचा विजय,'अॅट्रॉसिटी'बद्दल केंद्राचा मोठा निर्णय

रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची वाढ : ग्राहकांना फटका, गृहकर्ज महागणार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2018 06:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...