कोमात असलेल्या महिलेनं दिला मुलीला जन्म

कोमात असलेल्या महिलेनं दिला मुलीला जन्म

प्रगती १७ आठवड्यांची गर्भवती असताना पतीच्या मारहाणीमुळे कोमात गेली होती. तिला या अवस्थेत रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं

  • Share this:

हलिमा कुरेशी, पुणे

13 सप्टेंबर : पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ८५ दिवस कोमात असलेल्या ३२ वर्षीय प्रगती साध्वानी यांनी मुलीला जन्म दिल्याची घटना घडलीये.

प्रगती १७ आठवड्यांची गर्भवती असताना पतीच्या मारहाणीमुळे कोमात गेली होती. तिला या अवस्थेत रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉ. सुनिता आणि डॉ.वाडकर, तसंच नर्सिंग स्टाफ यांनी अतिशय काळजी घेत बाळ आणि आईकडे  डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक लक्ष दिलं. गर्भ न पाडता त्याला वाढवण्याचा निर्णय डॉक्टरानी घेतला. दुर्मिळ अश्या केसमधून प्रगतीचे उपचार करत,वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार घडवला. २८ जुलैला २ किलो २०० ग्राम वजनाच्या मुलीला प्रगतीने जन्म दिला.

बाळाच्या जन्माच्या वेळेस देखील प्रगती बेशुद्ध अवस्थेत होती. प्रगतीच्या दोन्ही भावांनी आपल्या बहिणीसाठी जीवाच रान केलं. बाळ आणि बहीण दोघांना सुखरूप पाहून त्याचा आनंद गगनात मावत नाहीय. डॉ.सुनिता यांनी माणुसकीचं दर्शन घडवत कोणतीही फी घेतली नाही. याविषयी आपण पंतप्रधान मोदींना पत्र लिहून कळवले आहे. मोदी यांनी डॉ सुनिता सारख्या डॉक्टरांचा सन्मान करावा अशी आशा त्यांना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 08:55 PM IST

ताज्या बातम्या