नाशिकमध्ये रिक्षांविरोधात RTOची मोठी कारवाई; स्क्रॅपसाठी JCBचा वापर

नाशिकमध्ये रिक्षांविरोधात RTOची मोठी कारवाई; स्क्रॅपसाठी JCBचा वापर

Nashik RTO act against auto : रिक्षा स्क्रॅप करण्यासाठी JCBचा वापर.

  • Share this:

नाशिक, प्रशांत बाग, 01 जून : नाशिकमध्ये मुदत संपलेल्या रिक्षांविरोधात RTOनं कठोर कारवाई करायला सुरूवात केली आहे. कालबाह्य रिक्षा स्क्रॅप करण्याची कारवाई RTOनं सुरू केली आहे. त्यासाठी जेसीबीचा देखील वापर केला जात आहे. शहरामध्ये 1572 रिक्षा या मुदत संपलेल्या आहेत. तर, 42 टॅक्सींची नोंदणी ही रद्द करण्यात आली आहे. ज्या 1572 रिक्षांची मुदत संपली आहे त्या जप्त करून त्या स्क्रॅप केल्या जात आहेत. त्यासाठी जेसीबीचा वापर केला जात आहे. यावर आरटीओ थांबत नसून दंड देखील आकारला जात आहे. पोलीस वाहतूक शाखा आणि आरटीओच्या दुहेरी कारवाईमध्ये आता शहरातील रिक्षा चालक अडकला आहे.दरम्यान, आरटीओची कारवाई रोखा अशी मागणी आता रिक्षा चालक – मालक संघटनेकडून केली जात आहे. रिक्षा चालक – मालक संघटनेकडून होणाऱ्या या मागणीला आता प्रादेशिक परिवहन खात्यानं केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे करायचं तरी काय असा प्रश्न रिक्षा चालक आणि मालकांपुढे उभा राहिला आहे..


VIDEO: उष्णतेनं हैराण झालेल्या दिलासा, गडचिरोलीत वादळीवाऱ्यासह दमदार पावसाच्या सरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: autonashik
First Published: Jun 1, 2019 01:46 PM IST

ताज्या बातम्या