आरएसएस ही सामाजिक संस्था नाहीच!,धर्मदाय आयुक्तांचा नोंदणीस नकार

‘राष्ट्रीय’ या शब्दामुळे धर्मदाय आयुक्तालयाला राज्यात संस्था नोंदणी करणे आपल्या अखत्यारित येत नसल्याच सांगत हा प्रस्ताव फेटाळला आहे.

Sachin Salve | Updated On: Oct 4, 2017 09:00 PM IST

आरएसएस ही सामाजिक संस्था नाहीच!,धर्मदाय आयुक्तांचा नोंदणीस नकार

04 आॅक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने संस्था नोंदणी करण्यास नागपुरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी नकार दिलाय. ‘राष्ट्रीय’ या शब्दामुळे धर्मदाय आयुक्तालयाला राज्यात संस्था नोंदणी करणे आपल्या अखत्यारित येत नसल्याच सांगत हा प्रस्ताव फेटाळला आहे.

१९२५ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही नोंदणी शिवाय सामाजिक संस्थे सारखं काम करत असल्यामुळे यावर आक्षेप याच नावाने संस्था स्थापन करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते धर्मदाय आयुक्तालयात गेले होते. आरएसएस ही संघटना नोंदणीकृत आहे का आणि त्यासाठी निधी कुठुन येतो आणि त्याचा हिशेब कसा ठेवला जातो याची माहिती माजी नगरसेवक जर्नादन मुन यांनी आरटीआय मध्ये मागितली होती. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची कुठलीही संघटना राज्यात अस्तित्वात नसल्याच चॅरिटी कमिश्नर कार्यालयाने दिली होती.

त्यावर ह्या नावाने संस्था नोंदणी करण्यासाठी मून यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रस्ताव सादर केला होता. यावर अनेकदा सुनावणी होऊन शेवटी आज राष्ट्रीय हा शब्द असल्याने नोंदणी करण्यास धर्मदाय आयुक्तांनी नकार दिला. दरम्यान संघाने वेळोवेळी संघ नोंदणीकृत नसल्याचं सांगत नोंदणीची आवश्यकताही नसल्याच सांगितलं होतं. पण चंद्रपुरचे अँड राजेंद्र गुंडलवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने केंद्र सरकारच्या अखरित्यात येणाऱ्या रिलिजिअस मेंबर्स आँर्गनायझेशनद्वारे आधीच नोंदणीकृत असल्यामुळे धर्मदाय आयुक्तांच्या न्यायालयात आक्षेप नोंदवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2017 09:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close