'मुक्त'ची भाषा फक्त राजकारणात चालते, संघात नाही - मोहन भागवत

'मुक्त'ची भाषा फक्त राजकारणात चालू शकते संघात त्याला स्थान नाही असं स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. परराष्ट्र मंत्रालयातले सचिव आणि लेखक ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेल्या आणि अनुवादित केलेल्या सहा पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 1, 2018 05:32 PM IST

'मुक्त'ची भाषा फक्त राजकारणात चालते, संघात नाही - मोहन भागवत

पुणे, 01 एप्रिल : राष्ट्रउभारणीच्या प्रयत्नांमध्ये सर्वसमावेशकता पाहिजे, सर्वांची साथ पाहिजे मुक्तची भाषा फक्त राजकारणात चालू शकते संघात त्याला स्थान नाही असं स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. परराष्ट्र मंत्रालयातले सचिव आणि लेखक ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेल्या आणि अनुवादित केलेल्या सहा पुस्तकांचं प्रकाशन आज मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी मोहन भागवत यांचा फुल्यांची पगडी घालून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला "स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप'चे अध्यक्ष संदीप वासलेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना वासलेकर म्हणाले काँग्रेस आणि संघाला काम करताना शंभर-दिडशेवर्ष होतआहेत. काँग्रेसचे विरोधक हे काँग्रेस मुक्त भारताची भाषा करतात तर संघाचे विरोधक संघ मुक्त भारताची. पण आज देशात मुक्तीची नाही तर युक्त करण्याची भाषा पाहिजे. तोच धागा पकडत सरसंघचालक म्हणाले वासलेकरांनी व्यक्त केलेलं मत योग्यच आहे. संघात कधीच मुक्त ची भाषा केली जात नाही. राष्ट्रउभारणीचं काम करणारे, न करणारे, पाय ओढणारे, विरोधक अशा सगळ्यांची साथ घेऊन पुढं गेलं पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार पटतीलच असं नाही पण म्हणून त्याला नाकारून चालणार नाही. राष्ट्र फक्त कुणा एका थोर नेत्यामुळं उभं राहत नाही. सर्वांच्या कामाची गोळाबेरिज म्हणजे राष्ट्रउभारणी असते असंही ते म्हणाले.

2014 च्या लोकसभा निवडणूकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. त्यावरून बरच वादळही निर्माण झालं होतं. तर भाजप आणि संघाच्या विरोधकांनी संघ मुक्त भारताचा नारा दिला होता या पार्श्वभूमीवर मोहन भागवतांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झालंय.

परराष्ट्र मंत्रालयात असताना जगातल्या अनेक देशात वास्तव्य करता आलं तिथला समाज आणि संस्कृती समजून घेता आली. हे करत असताना प्रत्येक वेळी भारताची भारताची भूमिका मांडण्याच काम केलं असं ज्ञानेश्वर मुळे यावेळी बोलताना म्हणाले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी परिचय झाल्यानंतर त्यांच्या विविध विषयांवरच्या भूमिका समजून घेता आल्या, त्या भूमिका या सर्वसमावेशक वाटल्यानेच त्यांना या कार्यक्रमाला बोलावलं असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2018 04:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close