..तर मुले गणपतीला 'एलिफंट गॉड' व हनुमानाला 'मंकी गॉड' म्हणतील- भागवत

इंग्रजी भाषेचा प्रभाव असाच सुरू राहिला तर भविष्यात लहान मुले गणपतीला 'एलिफंट गॉड' व हनुमानाला 'मंकी गॉड' म्हणतील, अशी भीती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 09:26 PM IST

..तर मुले गणपतीला 'एलिफंट गॉड' व हनुमानाला 'मंकी गॉड' म्हणतील- भागवत

प्रशांत मोहिते, (प्रतिनिधी)

नागपूर, 20 जुलै- इंग्रजी भाषेचा प्रभाव असाच सुरू राहिला तर भविष्यात लहान मुले गणपतीला 'एलिफंट गॉड' व हनुमानाला 'मंकी गॉड' म्हणतील, अशी भीती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली येथील संस्कृत अभ्यासक चमुकृष्ण शास्त्री यांच्या 'संस्कृतकक्ष्या' या पुस्तकाचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

संस्कृत भाषा जगातील अनेक विद्यापीठात शिकवला जातो, आपल्याकडेही हजारो विद्यार्थी संस्कृत भाषा निवडतात कारण संस्कृत भाषेच्या परीक्षेत जास्त गुण प्राप्त होतात. परंतु विद्यार्थी संस्कृत हा विषय केवळ दहावीपर्यंत ठेवतात, असेही भागवत यावेळी म्हणाले. संस्कृत भाषेने भारतीय समाजाला अक्षूंन्न ठेवल्याने सर्व भारतीय भाषेत समान भाव आहे. संस्कृत जाणल्याशिवाय भारताला ओळखणे कठीण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही ते संस्कृत शिकू शकले नाहीत, याचीही खंत व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, जर मी संस्कृत शिकलो असतो तर भारताला चांगल्या पद्धतीने समजू शकलो असतो, असेही मोहन भागवत यांनी भाषणादरम्यान सांगितले.

हेही वाचा..गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा, नराधम प्रियकर आणि ब्लॅकमेल करणारा शिक्षक फरार

मोहन भागवत Twitter वर; नरेंद्र मोदी नाही तर यांनाही करतात Follow!

Loading...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी देखील आता ट्विटरवर एन्ट्री केली आहे. महत्त्वाचे म्हणजे मोहन भागवत यांचं ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड आहे. पण, त्यांनी अद्याप एक देखील tweet केले नाही. मोहन भागवत यांची ट्विटरवरील एन्ट्री म्हणजे संघानं उचललेलं एक मोठं पाऊल मानलं जात आहे. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक सुरेश जोशी, सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सुरेश सोनी, कृष्ण गोपाळ, अनिरूद्ध देशपांडे यांचं देखील ट्विटर अकाऊंट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखील ट्विट अकाऊंट असून त्याला 13 लाख 10 हजार फॉलोअर्स आहेत. RSSच्या नेत्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाऊंटला देखील महत्व प्राप्त झालं आहे.

हेही वाचा.. मोठ्या हॉटेल्समध्ये मटण म्हणून दिलं जातं कुत्र्यांच मांस, FIR दाखल

कुणाला करतात फॉलो

सरसंघचालक मोहन भागवत यांचं ट्विटर अकाईंट व्हेरीफाईड आहे. मोहन भागवत यांनी twitter account सुरू केल्यानंतर RSSच्या अधिकृत हॅन्डलल फॉलो केलं आहे.

का आले भागवत ट्विटरवर

सरसंघचालक मोहन भागवत यांना फॉलो करणारा मोठा वर्ग देशात आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी twitter हे चांगलं माध्यम ठरू शकते. त्यामुळे मोहन भागवत यांनी आपलं ट्विटर अकाऊंट सुरू केलं असावी अशी चर्चा रंगली आहे. सध्या देशातील बराचसा वर्ग हा सोशल मीडियावर असतो. आपली गोष्ट एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर हा प्रभावी ठरत आहे. त्यामुळे मोहन भागवत यांची ट्विटरवरील एन्ट्री देखील तितकीच महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी संघातील काही नेत्यांसह भाजप नेत्यांचं देखील ट्विटरवर अकाऊंट आहे. त्यामुळे भागवत यांच्या अकाऊंटचं देखील महत्व वाढलं आहे.

VIDEO : भर बैठकीत वीज कंपनीच्या अधिकाऱ्याच्या लगावली कानाखाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: RSS
First Published: Jul 20, 2019 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...