राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा उत्सव साधेपणाने साजरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा उत्सव साधेपणाने साजरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रेसनोट काढून ही माहिती दिली आहे . मुंबईत चेंगराचेंगरीत गेलेल्या बळींना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

  • Share this:

नागपूर,30 सप्टेंबर: आजच्या विजयादशमीच्या दिवशी दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवर संघ नागपुरात मेळावा घेतो. याहीवर्षी विजयादशमीचा मेळावा आहे.  पण यंदा विजयादशमी साधेपणाने साजरी करत आहे. मुंबईत झालेल्य चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रेसनोट काढून ही माहिती दिली आहे . मुंबईत चेंगराचेंगरीत गेलेल्या बळींना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबागेत होणाऱ्या विजयादशमी उत्सवासाठी या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून दलित धार्मिक नेते संत निर्मल दास महाराज यांना आमंत्रित करण्यात आले होते.मात्र प्रकृती खराब झाल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. संघाच्या स्थापनेपासून आयोजित केल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमात सरसंघचालक काय भुमिका मांडतात याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले होते. विजयादशमीच्या दिवशीच नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. डाँ बाबासाहेब आंबेडकरांनीही विजयादशमीच्याच दिवशी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2017 10:11 AM IST

ताज्या बातम्या