News18 Lokmat

कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ऑनलाइन गंडा, 67 लाख 88 हजार लुटले

दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून ऑनलाइनद्वारे 67 लाख 88 हजार लुटल्याची घटना समोर आली आहे. ही रक्‍कम वेगवेगळ्या 34 खात्यांवर हस्तांतर करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 05:15 PM IST

कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ऑनलाइन गंडा, 67 लाख 88 हजार लुटले

कोल्हापूर ,22 एप्रिल- दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून ऑनलाइनद्वारे 67 लाख 88 हजार लुटल्याची घटना समोर आली आहे. ही रक्‍कम वेगवेगळ्या 34 खात्यांवर हस्तांतर करण्यात आली आहे.

दी कोल्हापूर अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव खरोशी यांनी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनोळखीविरुद्ध अपहार, फसवणूक, माहिती, तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरटीजीएस व एनईएफटी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करून, संशयिताने अर्बन बँकेला गंडा घालून फसवणूक केली असून शुक्रवारी सकाळी 11.05 ते दुपारी 2.28 या काळात ही घडली घटना आहे. कोल्हापूर पोलीस मुंबई सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 05:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...