रेशन दुकानात तूरडाळ 35 रूपये किलो दराने मिळणार

या निर्णयाने या हंगामात खरेदी केलेली आणि पुढील कालावधीत खरेदी करावयाच्या तुर साठवणुकीसाठी गोदामे रिकामी होण्यास मदत होईल.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 29, 2018 10:22 PM IST

रेशन दुकानात तूरडाळ 35 रूपये किलो दराने मिळणार

मुंबई, 29 मे :  राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून सध्या विक्री करण्यात येत असलेल्या तुरदाळीचा दर  55 रू प्रति किलो ऐवजी ग्राहकांच्या हितास्तव 35 रूपये प्रति किलो निश्चित करण्याचा मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

या निर्णयाने या हंगामात खरेदी केलेली आणि पुढील कालावधीत खरेदी करावयाच्या तुर साठवणुकीसाठी गोदामे रिकामी होण्यास मदत होईल. थेट ग्राहकांना लाभ होण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजनेतर्गत 55 रू. प्रती किलो ऐवजी 35 रु. प्रती किलो दराने तुरदाळ विक्रीचा निर्णय महत्वाचा आहे.

शासनाचे ज्या विभागात त्यांचे अंतर्गत असलेले सार्वजनिक उपक्रम,स्थानिक स्वराज्य संस्था,पुर्णत अथवा अंशत अनुदानित संस्थाव्दारे तुरदाळीची खरेदी पुढील आदेश होईपर्यत फक्त राज्य पणन महासंघाकडूनच शासकीय दराने तूर डाळ खरेदीचे करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2018 10:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...