डीएसकेंवर २ हजार ४३ कोटींच्या घोटाळ्याचा ठपका

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 17, 2018 11:44 PM IST

डीएसकेंवर २ हजार ४३ कोटींच्या घोटाळ्याचा ठपका

पुणे, 17 मे : बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णींवर २ हजार ४३ कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात आज आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल केलंय.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी सध्या येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने  पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात ३६ हजार ८७५ पानांचं आरोपपत्र आज  दाखल केलं. त्यात डीएसकेंनी २ हजार ४३ कोटींचा घोटाळा केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी 4 वाहनांमधून कागदपत्रं आणली. या सगळ्यामुळे डीएसके यांचे पाय आणखीनच खोलात गेल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2018 11:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...