S M L

आदिवासी विभागावर 2 लाख कोटींच्या आरक्षण घोटाळ्याचा आरोप

Updated On: Aug 11, 2018 05:05 PM IST

आदिवासी विभागावर 2 लाख कोटींच्या आरक्षण घोटाळ्याचा आरोप

पंढरपूर, 11 आॅगस्ट : राज्यातील आदिवासी मंत्रालयाने आदिवासी समाजाची बोगस लोकसंख्या दाखवून 38 वर्षांत 2 लाख कोटी रुपयांचा आरक्षण घोटाळा केला असल्याचा धक्कादायक आरोप धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य उत्तम जानकर यांनी केलाय.

या प्रकरणाची माहिती देण्यासाठी जानकर यांनी पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी आदिवासी मंत्रालय आणि जनगणना विभागाने केलेल्या बोगस आदिवासी लोकसंख्येचा पुराव्यासह भांडाफोड केला

1981 ते 2011 सलापर्यत आदिवासी विभागाने आदिवासीची संख्या 80 लाख इतकी दाखविली आहे. या 80 लाखामध्ये 19 लाख 50 हजार आदिवासी बोगस असल्याचा गंभीर आरोप जानकर यांनी केलाय.

अस्तित्वात नसलेल्या बोगस आदिवासींची वाढीव लोकसंख्या दाखवून या समाजाने राजकीय, शैक्षणिक, नोकरी आणि विकास निधीचा घोटाळा केला असल्याचा आरोप जानकर यांनी केलाय.

राज्यातील आरक्षणाच्या या महाघोटाळायची सीबीआय मार्फत चौकशी करुन लाभार्थीवर कारवाई करावी अशी मागणी जानकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

Loading...
Loading...

काय आहे आरोप ?

धनगर आरक्षणासाठी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवण्यात आली त्यात धक्कादायक बाब समोर आली. राज्यात 43 हजार धनगर समाज दाखवण्यात आला परंतु राज्यात एकही धनगर नाही. पण त्याही पुढे जाऊन 19 लाख 50 हजार बोगस आदिवासी समाज दाखवण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यात 80 हजार बोगस आदिवासी समाज दाखवण्यात आलाय. परंतू, सात हजार 300 पारधी लोकं सोडली तर पूर्णपणे कोणत्याही लोकं नाही. या राज्यात जवळजवळ 80 लाख आदिवासींची अधिकृत संख्या आहे. त्यामुळे 20 लाख ही बोगस संख्या दाखवण्यात आलीये. त्यामुळे यात 30 टक्के नोकऱ्यांचं लाभाचं प्रमाण, याशिवाय केंद्र आणि राज्याकडून मिळणारा लाभ याची आकडेवारी पाहिली तर 2 लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आदिवासी विभागाने केलाय. गेल्या 40 वर्षातली माहिती आमच्याकडे आहे या माहितीतून घोटाळा केला.

या घोटाळ्याला कायद्याचं संरक्षण आहे. कोणत्याही जातीची एससी आणि एसटीची याची कुटुंब पत्रक द्यायची नाही, फक्त संख्या जाहीर करायची त्यामुळे हा घोटाळा घडलाय असा आरोप उत्तम जानकर यांनी केलाय. आघाडी सरकारपासून हा घोटाळा सुरू आहे पण याची माहिती पुढे येऊ दिली नाही असा आरोपही जानकरांनी केला.

 

हेही वाचा

VIDEO : पक्ष्यांच्या विष्ठेचा वास येतो म्हणून झाडं तोडली, दोनशे पिल्लं हकनाक मेली

राजकुमार रावचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिलात का?

या दिग्गजांनीही बसवले वाहतुकीचे नियम धाब्यावर, दंड भरला नाही

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण - आणखी दोन जण एटीएसच्या ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2018 05:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close