पुण्यातील नव्या पार्किंग धोरणाविरूद्ध सर्वपक्षीय संघटनांचं आंदोलन

महापालिकेनं पार्किंगसाठी सामान्यांच्या आवाक्या बाहेरची किंमत वसूल करण्याचं धोरण काढलं आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध होतोय. त्यापूर्वी महापालिका परिसर आंदोलनांनी दणाणून निघाला

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2018 11:17 PM IST

पुण्यातील नव्या पार्किंग धोरणाविरूद्ध सर्वपक्षीय संघटनांचं आंदोलन

23 मार्च: पुणे शहरात नव्याने लागू करण्यात येणारं पार्किंग धोरण मुख्यसभेसमोर मांडलं जाणार आहे. याआधीच सर्वच विचारांच्या संघटनांनी त्याचा विरोध केलाय.

महापालिकेनं पार्किंगसाठी सामान्यांच्या आवाक्या बाहेरची किंमत वसूल करण्याचं धोरण काढलं आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध होतोय.   त्यापूर्वी महापालिका परिसर आंदोलनांनी दणाणून निघाला. पतित पावन संघटनेकडून बैल आणि घोडागाडीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलं. तर संभाजी ब्रिगेडनं भीक मांगो आंदोलन करत पार्किंग धोरणाचा विरोध केला आहे. यावेळी भीम आर्मी तसंच काँगेसकडूनही जोरदार आंदोलन करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये पार्किंग धोरणाला मंजुरी देण्यात आल्यानंतर ते आज मुख्यसभेसमोर मांडलं जाणार आहे. भाजप वगळता सर्वपक्षीयांचा पार्किंग शुल्क आकरण्यास तीव्र विरोध आहे

त्यामुळे  आतातरी महापालिका आपलं धोरण मागे घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2018 11:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...