विधानसभेसाठी रोहित पवारांचा मतदारसंघ अखेर ठरला

रोहित पवारांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानलं जात असून भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 08:30 PM IST

विधानसभेसाठी रोहित पवारांचा मतदारसंघ अखेर ठरला

चंद्रकांत फुंदे, पुणे 2 जुलै : विधानसभेच्या निवडणुकांना आता काही महिनेच राहिले आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पवार कुटुंबीयातली तरुण पाती आता राजकारणात सक्रीय होत आहे. पार्थ पवारानंतर आता रोहित पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विधानसभेसाठी कर्जतमधून उमेदवारी मिळावी अशी त्यांनी पक्षाकडे केलीय. गेल्या काही वर्षांपासून ते समाजकारणात सक्रिय असून त्यातून त्यांनी मतदारसंघाची बांधणी केलीय.

रोहित पवारांनी कर्जत भागात गेली काही वर्ष सतत दौरे करत कार्यकर्त्यांची फळीही तयार केलीय. या आधी त्यांनी पुण्याच्या हडपसरमधूनही चाचपणी केली होती. मात्र कर्जत हा सगळ्याच दृष्टिने सुरक्षित मतदार संघ असल्याने त्यांनी कर्जतची निवड केली. त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानलं जात असून भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे.

VIDEO : यांच्या धाडसाला सलाम ! जीव धोक्यात घालून पुरातून आजीला काढलं बाहेर

लोकसभेच्या निवडणुकीत पार्थ पवार यांची उमेदवारी चांगलीच गाजली होती. पार्थ यांची उमेदवारी घोषीत झाल्यानंतर रोहित यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती त्यावरून मोठी चर्चा झाला होती. रोहित यांनी अशी पोस्ट सोशल मीडियावर लिहियला नको होती. त्यांना जे काही वाटतं ते त्यांनी थेट पवार साहेबांना सांगायला पाहिजे होतं असं मत पार्थ पवारांनी व्यक्त केलं होतं.

काय होती रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट?

Loading...

"राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाच, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं.

VIDEO : सेल्फी घेताना धक्काबुक्की करणाऱ्या चाहत्याला कतरिनानं असं केलं हॅन्डल

“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा.”

बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 08:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...