शरद पवारांवरील टीका नातवाच्या जिव्हारी, पूनम महाजनांना म्हणाला....

राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस महाजन यांच्याविरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळाली. अशातच आता पवारांचे नातू असलेल्या रोहित पवार यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहित पूनम महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 5, 2019 04:57 PM IST

शरद पवारांवरील टीका नातवाच्या जिव्हारी, पूनम महाजनांना म्हणाला....

बारामती, 5 फेब्रुवारी : भाजप खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा शकुनीमामा असा उल्लेख करत त्यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस महाजन यांच्याविरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळाली. अशातच आता पवारांचे नातू असलेल्या रोहित पवार यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहित पूनम महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

'भाजप नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली तेव्हा पूनम महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या. आत्ता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहीलं ते आपणच सांगू शकता,' असं म्हणत रोहित पवार यांनी पूनम महाजन यांना अप्रत्यक्षपणे महाभारतातील गांधारीची उपमा दिली आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट

गिरीष महाजन म्हणाले होते,

“दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्या मग खप कसा वाढतो ते बघा.”

Loading...

गिरीष बापट म्हणाले होते,

“तुमच्या मोबाईलमध्ये काय असतं ते माहित आहे, तुम्ही मला म्हातारे समजू नका, या पिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे.”

राम कदम म्हणाले होते,

“पोरी पटत नसतील तर पळवून आणा मी तुमच्या पाठीशी आहे…

आत्ता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे हि विधाने करण्यात आली तेव्हा पूनम महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या. आत्ता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहीलं ते आपणच सांगू शकता.

काय म्हणाल्या होत्या पूनम महाजन?

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्यासारखे आहेत. तर शरद पवार हे शकुनी मामा आहेत,’ असं विधान भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी केलं आहे. सीएम चषक या मुंबईतील कार्यक्रमात बोलताना पूनम महाजन यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला.

महागठबंधन नाही ते तर महाठगबंधन आहे, असं म्हणत पूनम महाजन यांनी विरोधकांच्या आघाडीची खिल्लीही उडवली आहे. पूनम महाजन यांनी आक्रमक होत विरोधकांवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादीकडून मुंबईत पोस्टरबाजी

पूनम महाजन यांनी युवा मोर्चा कार्यक्रमात शरद पवार यांचा शकुनीमामा असा उल्लेख केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पूनम महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादीने जोरदार टीका केली आहे. आज एनसीपी युवकच्या वतीने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टरबाजी करत प्रमोद महाजन यांचं मृत्यू प्रकरण उकरून काढत पूनम महाजन यांच्यावर टीका केली आहे.


Special Report : मोदी विरुद्ध ममता की ममता विरुद्ध राहुल?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2019 04:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...