भररस्त्यावर कोयत्याचा धाक दाखून दोघांना लुटलं

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2018 08:22 PM IST

भररस्त्यावर कोयत्याचा धाक दाखून दोघांना लुटलं

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 03 आॅक्टोबर : एकीकडे बालअत्याचाराचा घटनांनी पिंपरी चिंचवड शहर हादरलेलं असतांना दुसरीकडे शहरातील गुन्हेगार शस्त्राच्या धाकावर सर्वसामान्यना कस वेठीस धरतात, ह्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होतोय.

पिंपरी शहरातील कुदळवाडी परिसरात घडलेल्या घटनेच हे सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यामध्ये भर रस्त्यावरून चालत येणाऱ्या दोन तरुणांना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून अडवलं. त्या पैकी एकाचा मोबाईल हिसकावून घेतला, दुसरा तरुण मात्र मोबाईल द्यायला तयार नव्हता. मग आणखी एका दुचाकीवर तिघे आले, त्या सर्वांनी त्याला बेदम चोप दिला आणि मोबाईल लुटला.

हे करत असताना ह्या टोळक्याच्या हातात कोयते असल्याने, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकही त्या पादचाऱ्यांच्या मदतीला धावू शकले नाहीत.

या सगळ्या घटनेचा आता निगडी पोलीस तपास करतायत मात्र या टोळीमुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

Loading...

====================================================================

VIDEO : नवनीत राणांचा धम्माल दांडिया डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2018 08:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...