कन्‍नडमध्ये SBI फोडली.. पण, यामुळे रिकाम्या हातांनी परतले चोरटे

कन्‍नडमध्ये SBI फोडली.. पण, यामुळे रिकाम्या हातांनी परतले चोरटे

चापानेर येथील मुख्य रस्त्यावर असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा पाठीमागील दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बँकेतील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर पांढरी चिकटपट्टी लावली होती.

  • Share this:

औरंगाबाद, 24 जून- नाशिक शहरात उंटवाडी परिसरात मुथुट फायनान्सवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना औरंगाबाद जिल्ह्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचा शाखा चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. कन्‍नड तालुक्यातील चापानेर येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी फिगंर प्रिट व डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले आहे.

चापानेर येथील मुख्य रस्त्यावर असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा पाठीमागील दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बँकेतील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर पांढरी चिकटपट्टी लावली होती. त्यानंतर चोरट्यांनी बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. कटरने व रॉडने तिजोरीवर वार केले तरी देखील चोरट्यांना तिजोरी फोडण्यात यश आले नाही. बँकेतील कागदपत्रे आस्तावेस्त फेकले असून बँकेतील रोख रक्‍कम पळवण्यात चोरट्यांना यश आले नाही. चोरट्यांनी जाताना सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळवला आहे. ही घटना सोमवारी (24 जून) सकाळी बँक उघडण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधीकार्‍यांना माहिती दिली. बँक अधीकार्‍यांना तात्काळ कन्‍नड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. फिगर प्रिट तज्ञ व डॉग स्कॉडला पाचारण केले.

मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

नाशकातील उंटवाडी परिसरात मुथुट फायनान्सवर 11 जून रोजी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाला होता. सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले होते. दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले होते. परंतु, फरार आरोपींना जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहेत. मृत कर्मचारी हा मुथुट फायनान्सचा हेड ऑफिसमधून आलेला ऑडिटर होता. त्याच्या शरीरात 6 गोळ्या आढळल्या होत्या. सायरन वाजल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला. वर्दळीच्या भागात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. नाशिकमध्ये दिवसेंदिवस चोरी, दरोड्यासह गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत.

...आणि संभाजीराजेंना अश्रू अनावर झाले, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2019 03:19 PM IST

ताज्या बातम्या