नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

नाशिक शहरातील उंटवाडीत परिसरात मुथुट फायनान्सवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

प्रशांत बाग (प्रतिनिधी)

नाशिक, 14 जून- शहरातील उंटवाडीत परिसरात मुथुट फायनान्सवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत कर्मचारी हा मुथुट फायनान्सचा हेड ऑफिसमधून आलेला ऑडिटर असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या शरीरात 6 गोळ्या आढळल्या आहेत. सायरन वाजल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला. घटनास्थळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्वत: उपस्थित असून घटनेचा आढावा घेत आहेत.

मिळालेली माहिती अशी की, उंटवाडीत सिटी सेंटर मॉल जवळच्या मुथूट फायनान्सच्या सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने गोळीबार केला. यात ऑडिटरचा मृत्यू झाला असून वॉचमनसह तीन जण जखमी आहेत. राऊंड फायर झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर व पिस्तूल होते. जो अडवेल त्याच्यावर ते गोळीबार करत होते. जखमीवर उपचार सुरु आहेत.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात हा गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. नाशिकमध्ये दिवसेंदिवस चोरी, दरोड्यासह गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत.


मुंबईत उड्डाणपुलाखाली भीषण अग्नितांडव, गाड्या जळून खाक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2019 01:25 AM IST

ताज्या बातम्या