खळबळजनक; मोबाईल चार्जरने दरोडेखोरांकडून महिलेची हत्या

खळबळजनक; मोबाईल चार्जरने दरोडेखोरांकडून महिलेची हत्या

दरोडेखोरांनी एका 61 वर्षीय महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना गेवराई उघडकीस आली आहे.

  • Share this:

बीड, 1 एप्रिल: गेवराई शहरातील खडकपुरा भागातील ( खक्का मार्केट ) येथील राहणाऱ्या शर्मा कुटुंबाच्या घरात अज्ञात दरोडेखोरांनी रात्री घरात प्रवेश करून घरातील सोने व चांदीचे दागिन्यांसह पाच लाखाचा ऐवज लुटला. दरोडेखोरांनी एका 61 वर्षीय महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना गेवराई उघडकीस आली आहे. हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव पुष्पाबाई शिवप्रसाद शर्मा असे आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत.


गेवराई शहरातील खक्का मार्केट भागात राहणाऱ्या एका शर्मा नावाच्या कुटुंबाच्या घरी पहाटे अज्ञात चोरट्यानी चोरी केली. यावेळी घरात असलेल्या एका महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने तोडून घेत मोबाईल चार्जरच्या साहाय्याने तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केल्याची पोलिसांनी माहिती दिली.


VIDEO : विखे आणि थोरात एकत्र पण एकमेकांकडे पाहिलेही नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2019 11:40 AM IST

ताज्या बातम्या