भीषण अपघातात 5 जण ठार, 2 लहान मुलं गंभीर जखमी

पंढरपूर-सोलापूर रोडवर वेगानं जाणाऱ्या मारुती कारनं समोरून एसटीला धडक दिली.

News18 Lokmat | Updated On: Feb 2, 2019 08:06 PM IST

भीषण अपघातात 5 जण ठार, 2 लहान मुलं गंभीर जखमी

सोलापूर, 2 फेब्रुवारी : पंढरपूर-सोलापूर रोडवर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण ठार झाले असून 2 लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. अपघातात ठार झालेले सर्वजण मुंबईचे रहिवासी असल्याची माहती आहे.

पंढरपूर-सोलापूर रोडवर वेगानं जाणाऱ्या मारुती कारनं समोरून एसटीला धडक दिली. टक्कर इतकी भीषण होती की अर्ध्याहून अधिक मारुती कार बसमध्ये घुसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन लहानगी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

इस्लामपूर आगाराची इस्लामपूर- अक्कलकोट ही बस सोलापूरकडे निघाली होती. देगावच्या हद्दीत एक मारुती इको कार बसवर आदळली. या कारला बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या वाहनाचा वापर करावा लागला.

दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून प्रचंड गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातानंतर काही वेळ लोटला तरीही वाहतूक पूर्ववत होऊ शकली नव्हती.


Loading...

VIDEO : भूकंपाच्या 7 हादऱ्यांनंतर या कोरड्या पडलेल्या बोअरवेलला लागलं धो धो पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2019 08:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...