Elec-widget

कारने दिलेल्या धडकेत रिक्षा 15 फुट लांब उडाली, 5 जण गंभीर

कारने दिलेल्या धडकेत रिक्षा 15 फुट लांब उडाली, 5 जण गंभीर

मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने हे अपघात होत आहेत, असं प्रवाशांचं म्हणणं आहे.

  • Share this:

चिपळूण, 11 नोव्हेंबर : मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ इथं कार आणि रिक्षाचा जोरदार अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यातील एका जणाची प्रकृती गंभीर आहे.

गोव्याच्या दिशेला जाणाऱ्या एका महिंद्रा TUV कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की रिक्षा रस्त्यापासून जवळपास 15 फुट लांब फेकली गेली. या भीषण अपघातात 5 जण जखमी झाले असून एक जण गंभीर आहे. अपघातात जखमी झालेल्यांना डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने हे अपघात होत आहेत, असं प्रवाशांचं म्हणणं आहे.

राज्य सरकारकडून वारंवार खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा केली जाते. मात्र रस्त्यांची स्थिती जैसे थे असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या अपघातांनंतर तरी सरकार रस्ते दुरुस्तीची कामे वेगाने करणार का, हे पाहावं लागेल.


Loading...

VIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2018 09:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...