ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा; 4 ठार, 1 जखमी

ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा; 4 ठार, 1 जखमी

मनमाडजवळ चोंडी घाटात ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा अक्षरश: चुराडा झाला.

  • Share this:

मनमाड, 25 फेब्रुवारी : पुणे-इंदौर महामार्गावर मनमाड इथं कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून एक प्रवासी जखमी झाला आहे.

मनमाडजवळ चोंडी घाटात ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. जखमी प्रवाशाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या पुणे-इंदौर महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असल्याचं चित्र आहे. हा महामार्ग मृत्यूचा सापळा झालाय की काय, असा सवालही आता उपस्थित करण्यात येत आहे.


VIDEO : नदीत बंधारा म्हणून अमित शहांना बसवणार का?, राज ठाकरेंचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 08:16 AM IST

ताज्या बातम्या