अनेकांना धडक देत ट्रक सुसाट, नागरिकांनी पाठलाग करून चालकाला दिला चोप

ट्रकचालकाने भरधाव वेगाने ट्रक चालवत अनेकांना उडवलं. यामध्ये 4 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2019 09:55 AM IST

अनेकांना धडक देत ट्रक सुसाट, नागरिकांनी पाठलाग करून चालकाला दिला चोप

औरंगाबाद, 3 मार्च : ट्रकच्या धडकेत चार जण जखमी झाल्याची घटना औरंगाबादमधील चेलीपुरा इथं घडली आहे. त्यानंतर लोकांना धडक देत बेदरकारपणे निघुन जाणाऱ्या ट्रकचालकाचा नागरिकांनी पाठलाग करत त्याला चांगलाच चोप दिला आहे.

चेंलीपुरा ते शहागंज यादरम्यान एका ट्रकचालकाने भरधाव वेगाने ट्रक चालवत अनेकांना उडवलं. यामध्ये 4 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या सगळ्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शहागंज इथे ट्रक अडवला. त्यानंतर जमावाने चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये ट्रक चालकही गंभीर जखमी झाला आहे.

संबंधित चालकाने लोकांना असं निर्दयीपणे का चिरडलं, याप्रकरणी आता पोलीस अधिक चौकशी करत आहेत. चालकाची मानसिक स्थिती तर बिघडली नव्हती ना, अशी चर्चाही नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.


Loading...

उदयनराजेंनी कुणाला म्हटलं, 'I Love You So Much'? पाहा व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2019 09:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...