क्रुझर आणि ऑटोच्या भीषण अपघातात तीन ठार

अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कुठलीही कारवाई केली जात नाही त्यामुळे अशी वाहतूक कायम सुरू राहते असाही आरोप नागरिकांनी केलाय.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 05:10 PM IST

क्रुझर आणि ऑटोच्या भीषण अपघातात तीन ठार

यवतमाळ 30 मे : यवतमाळ जिल्ह्यातील मुकूटबन जवळ क्रुझर आणि ऑटोची समोरासमोर धडक होऊन आज भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर या अपघातात सात जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर वणी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पांढरकवडा येथिल एक ऑटो प्रवाशांना घेऊन मुकूटबनला जात होता त्याचदरम्यान मुकूटबन पासून दीड किलोमीटर अंतरावर समोरून भरधाव वेगाने एक क्रूझर येत होती. या गाडीच्या ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि क्रूझर ने ऑटोला जोरदार धडक दिली.  ही धडक एवढी भीषण होती की ऑटो रस्त्याच्या खाली अक्षरश 50 ते 60 फूट फेकल्या गेला. या अपघातात बापूराव पानघाटे, ओम दत्ता पिदूरकर आणि उज्वला कुंतावार यांचा जागीच मृत्यू झाला. तर 7 जण जखमी झाले. जखमींवर वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. क्रूझरचा चालक घटना स्थावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

या मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठी वाहतूक असते. या गाड्या या अतिशय वेगाने चालवल्या जातात. त्याचबरोबर या गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसं बसवली जातात. त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडतात. अशा अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कुठलीही कारवाई केली जात नाही त्यामुळे अशी वाहतूक कायम सुरू राहते असाही आरोप नागरिकांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...