Elec-widget

ब्रिटिश एअरवेज वर्णव्देषी,त्यांच्यावर बहिष्कार टाका : ऋषी कपूरचा संताप

ब्रिटिश एअरवेज वर्णव्देषी,त्यांच्यावर बहिष्कार टाका : ऋषी कपूरचा संताप

  • Share this:

मुंबई,ता.10 ऑगस्ट : ब्रिटिश एअरवेज वर्णव्देषी असून त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. या एअरवेजने प्रवास करणं थांबवण्याचा मी निर्णय घेतलाय असं अभिनेते ऋषी कपूस यांनी ट्विटरवरून जाहीर केलंय. लहान बाळ रडत असल्याने एका भारतीय कुटूंबाला विमानातून उतरवल्याची संतापजनक घटना गुरूवारी उघडकीस आली होती. त्यावर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्विटरवर नेहमी सक्रिय असणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केलाय. ब्रिटिश एअरवेज ऐवजी तुम्ही जेट एअर किंवा इमिराट्स मधून प्रवास करा असला सल्लाही त्यांनी दिला आहे. त्या कुटूंबाची घटना कळल्यानंतर अतिशय दु:ख झालं असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

विमानात प्रवासादरम्यान तीन वर्षांचे बाळ रडल्यामुळे युरोपातील ब्रिटीश एअरवेजच्या लंडन- बर्लिन (बीए८४९५) या नावाजलेल्या विमान कंपनीने भारतीय कुटुंबाला विमानातून उतरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानातील प्रवासादरम्यान, तीन वर्षांचे बाळ रडत होते. त्याची आई त्याला शांत करण्याचा प्रयत्नही करत होती. दरम्यान, विमानातील कर्मचाऱ्याने त्याला भीती दाखवली. त्यामुळे ते मूल आणखीन रडू लागलं. त्या कर्मचाऱ्याने आक्षेपार्ह टिप्पणी करत त्यांना विमानातून उतरवलं असा आरोप त्या भारतीय कुटुंबियांनी केला आहे.

खळबळजनक खुलासा : 'मुंबई, पुणे, सातारा हिंदु्त्ववाद्यांच्या रडावर', 20 बॉम्ब जप्त

विमानात बाळ रडल्यामुळे भारतीयांना विमानातून उतरवलं

Loading...

विमानातील इतर भारतीयांनीही त्या मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्या मुलाचे रडणे शांत होत नव्हते. त्या कर्मचाऱ्याने इतर भारतीयांनाही विमानातून खाली उतरवलं असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. मुलाचे वडील हे रस्ते वाहतूक मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांना सांगितला. सीटबेल्ट बांधताना आमचा मुलगा रडू लागला त्याला शांत करण्याचा पत्नी प्रयत्न करत असताना, विमानातील काही कर्मचारी तिच्यावर ओरडू लागले. त्यामुळे मूल आणखीन घाबरलं.

पळून जाऊन लग्न करायचं? पहिले प्रेयसीच्या नावाने करावी लागणार एफडी

तसंच हे असंच रडलं तर त्याला उड्डाणावेळी खिडकीतून बाहेर फेकून देण्यात येईल असंही ते कर्मचारी म्हणाले अशी तक्रार त्या कुटुंबियांनी केली. याप्रकरणी एअरलाइन्सने अशा घटनांचा गांभीर्याने विचार करुन, लवकरात लवकर कार्यवाई करु. प्रवाशांसोबत भेदभाव करणं सहन केलं जाणार नसून, या घटनेची तातडीने चौकशी सुरू केली आहे, असे ब्रिटीश एअरवेजच्या प्रवक्याने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2018 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...