राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येण्यास सुरूवात

सोमवारी 3हजार 692ग्रामपंचायतींसाठी मतदान करण्यात आलं होतं. त्याच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली आहे. हळूहळू सर्व ग्राम पंचायतींचे निकाल येत आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2017 04:14 PM IST

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येण्यास सुरूवात

17 ऑक्टोबर: राज्यभरातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल येण्यास आता सुरूवात झाली आहे. सोमवारी 3हजार 692ग्रामपंचायतींसाठी मतदान करण्यात आलं होतं. त्याच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली आहे. हळूहळू सर्व ग्राम पंचायतींचे निकाल येत आहेत.

सांगलीच्या ग्रामपंचायत निवडणूकीत हरिपूरमध्ये भाजप प्रणित बोन्द्रे गटाचा एकतर्फी विजय झाला आहे. 1 सरपंच अधीक 17 अशा सर्व 18 जागांवर बोन्द्रे गटाचं पॅनल विजयी झालं असून या पॅनलने काँग्रेसच्या मोहिते गटाचा पराभव केला आहे. तर नारायण राणे यांचं समर्थ विकास पॅनल सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यात आघाडीवर आहे. दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी गडात राणेंच्या विकास पॅनलने मुसंडी मारली आहे. दोडामार्ग आणि कणकवली तालुक्यात राणेच्या वर्चस्वाला हादरा देत शिवसेना व भाजप आघाडीवर आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू असून विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. मुरबाड येथील 13 पैकी 8 ग्रामपंचायती राष्ट्रवादी-शिवसेना युतीने पुरस्कृत पॅनलला मिळाल्या आहेत.संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या ग्राम पंचायतींचे निकाल स्पष्ट होतील.

दरम्यान पुढच्या महिन्यात भाजप आपल्या सरपंचांचा मेळावा घेणार आहे. आपले खरंच किती सरपंच निवडून आले हे दाखवण्यासाठी भाजप हा मेळावा घेणार असल्याची सगळीकडे चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2017 04:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...