एसटी बसेसमधून शेतीमाल आणि दुधाची वाहतूक करण्यास बंदी

एसटी बसेसमधून शेतीमाल आणि दुधाची वाहतूक करण्यास बंदी

एसटी बसेसमधून शेतीमाल, फळं, दूध आणि भाज्यांना वाहतूक करण्यास परिवहन मंडळाने बंदी घातलीये. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

  • Share this:

02 जून : एसटी बसेसमधून शेतीमाल, फळं, दूध आणि भाज्यांना वाहतूक करण्यास परिवहन मंडळाने बंदी घातलीये. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून दिलंय. तसंच शेतीमाल वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून शेतीमाल रस्त्यावर फेकून दिलाय. या आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेता एसटी महामंडळाने पुढील काही दिवस शेतीमाल विक्री करण्यास बंदी घालण्याचा फतवा जारी केलाय.

सुरक्षेच्या कारणामुळे ही बंदी घालण्याचा परिवहन महामंडळाचे सुरक्षा आणि दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांनी जिल्ह्यातल्या आगार प्रमुखांना पत्र लिहिलंय.

दर शेतीमालाची  वाहतूक झाल्यास एसटीवर दगडफेक होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, संपाच्या काळात एसटीमधून जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीस परवानगी दिली जाते. परंतु, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या खात्यानं हे पत्रक काढल्यानं आश्चर्य व्यक्त केलंय जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 08:39 PM IST

ताज्या बातम्या