रेश्मा पडनेकूर हत्येप्रकरणी MIM चा नगरसेवक तौफिक शेख विरोधात गुन्हा दाखल

रेश्मा पडनेकूर हत्येप्रकरणी MIM चा नगरसेवक तौफिक शेख विरोधात गुन्हा दाखल

  • Share this:

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 17 मे - एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख याच्या विरोधात अखेर विजयपूर जिल्ह्यातील कोलार पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेश्मा पडनेकूर या महिलेची हत्या केल्याचा आरोप तौफिक शेखवर ठेवण्यात आला आहे. मृत महिलेचा पती बंदे नवाज पडनेकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तौफिक शेखच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी तौफिक शेख फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तौफिक शेख याने रेश्माकडून 13 लाख रुपये घेतले होते. गुरुवारी रात्री रेश्माचे घरातून अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली. तौफिक शेख विरोधात कलम 302, 201 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजयपूर परिसरात आढळला होता मृतदेह

बेपत्ता असलेल्या रेश्मा पडनेकूर यांच्या मृतदेह सोलापूरच्या विजयपूर परिसरात आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रेश्मा पडनेकूर यांनी एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. 17 एप्रिल रोजी रेश्मा यांनी सोलापूरचे एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती. तक्रार दिल्यापासून रेश्मा या बेपत्ता होत्या. काल रात्रीच्या विजयपूर जवळील कोलार गावात त्यांच्या मृतदेह सापडला. रेश्मा यांच्या हत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.

रेश्मा यांच्या अशा मृत्यूमुळे संशयाची सुई एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांच्यावर आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफिक शेख आणि रेश्मा यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. त्यामुळे तौफिक शेख यांच्या पत्नीनेदेखील रेश्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यावेळी ही तक्रार करण्यात आली त्यादिवसापासून रेश्मा या बेपत्ता होत्या. पोलीस त्यांचा शोध घेत होती. पण गुरुवारी रात्री त्यांचा मृतदेह सापडल्याने घटनेला वेगळं वळण लागलं आहे.पोलिसांनी रेश्मा यांचा मृतेदह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर या प्रकरणात पोलीस आता प्रत्यक्षदर्शींपासून ते तौफिक शेख यांचीही चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2019 10:40 PM IST

ताज्या बातम्या