S M L

नरेंद्र दराडे यांना दिलासा, 12 तासांच्या छाननीनंतर दराडेंचा अर्ज वैध

नाशिक विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अखेर शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अर्ज 12 तासांच्या छाननीनंतर वैध ठरवण्यात आला.

Renuka Dhaybar | Updated On: May 5, 2018 11:03 AM IST

नरेंद्र दराडे यांना दिलासा, 12 तासांच्या छाननीनंतर दराडेंचा अर्ज वैध

05 मे : नाशिक विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अखेर शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अर्ज 12 तासांच्या छाननीनंतर वैध ठरवण्यात आला.

दराडेंच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अर्जाच्या छाननीमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेला चांगलाच घाम फोडला. शिवसेना उमदेवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतली होती.

दराडे यांच्या पत्नीच्या नावाने येवला नगरपालिकेची दीड लाख रुपयांची थकबाकी आहे. अर्ज भरताना अपूर्ण अर्ज भरला आहे. दराडे यांच्यावर अवलंबून असणाऱ्या वारसाची माहिती असणारा रकाना जोडला नसल्याचा आक्षेप राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला होता. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात एकच धावपळ उडली.

नाशिक विधानपरिषद निवडणूक

- राष्ट्रवादी उमेदवार ऍड शिवाजी सहाणे यांचा आक्षेप फेटाळला

Loading...
Loading...

- शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांना दिलासा

- पत्नीच्या मालमत्तेची कर थकबाकी आणी अवलंबून व्यक्तींची माहिती अर्जात नाही हा होता आक्षेप

- दराडेंनी सादर केल्या कर भरल्याच्या पावत्या

- तर अर्जातील इतर माहितीत कुटुंबातील करदात्यांच्या दिलेली माहिती धरली निकालासाठी ग्राह्य

- या निकालाविरुद्ध राष्ट्रवादी उमेदवार ऍड शिवाजी सहाणे जाणार कोर्टात

- तर नरेंद्र दराडे यांची कोर्टात कॅव्हेट दाखल करण्याची तयारी

- सलग 12 तास चालली सुनावणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2018 11:03 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close