भिवंडीत रुग्णाच्या नातेवाईकांचा राडा , दोन डॉक्टरांना मारहाण

भिवंडीत रुग्णाच्या नातेवाईकांचा राडा , दोन डॉक्टरांना मारहाण

ICUमध्ये भेटायला जाण्याची परवानगी दिली नाही या रागातून दोन डॉक्टरांना नातेवाईकांनी मारहाण केली.

  • Share this:

रवी शिंदे, भिवंडी 30 जुलै : भिवंडी शहरातील नारपोली येथील काशीनाथ पाटील हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी आज दोन डॉक्टरांना मारहाण केल्याने खळबळ उडालीय. सरकारने अनेकदा सांगूनही आणि आश्वासन देऊनही डॉक्टरांच्या मारहाणीच्या घटनेमध्ये काही घट होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येते आहे.

'हतनूर'चे 41 दरवाजे उघडले, 'ड्रोन कॅमेऱ्या'ने घेतलेले Exclusive PHOTO पाहून थक्क

या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला  आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ICUमध्ये भेटायला जाण्यासाठी सक्त मनाई असते. अगदी मोजक्या वेळेलाच रुग्णाला भेटीची परवानगी दिली जाते. मात्र भेटण्यास मनाई केल्याच्या रागातून एका नातेवाईकाने  रुग्णालयात तोडफोड करून डॉ. शाहीद खान आणि डॉ.स्वाती खान या दोघांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली असून जखमी डॉक्टरांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हाही दाखल केलाय. डॉक्टरांच्या तक्रारीवरून  नारपोली  मुश्ताफा शेख याला घेतलं ताब्यात घेतलंय.

भाजप नगरसेवकाची मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि खुर्ची मारण्याचा प्रयत्न

आठवड्याभरापूर्वी  नाशिक जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली होती. इथल्या पेठ ग्रामीण रुग्णालयात काही लोकांनी तोडफोड आणि डॉक्टरांना शिवीगाळ केल्याने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय. आरोपींवर कारवाई आणि सुरक्षेच्या उपाययोजना केल्याशीवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही डॉक्टरांनी दिलाय.

दिड कोटी खर्च करून बांधला बंधारा, एकाच पावसात वाहून गेला

मंगळवारी रात्री साडेसात वाजता ग्रामीण रुग्णालयात पेठ येथे दोन इसमांनी  मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि कर्मचार्‍यांना  शिवीगाळ केली. कर्मचाऱ्यांनी त्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही. त्यांनी अजून लोक जमा करून दवाखान्यातील कुंड्या तोडल्या आणि कर्मचाऱ्यांना मारण्याची धमकी दिली. हल्ल्याचाही प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधासाठी आता सरकारी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्ट आणि कर्मचारी यांनी ,बाह्यरुग्ण तपासणी बंद केलीय. दरम्यान, याप्रकरणी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2019 09:50 PM IST

ताज्या बातम्या